मुंबई : आता तुमच्या स्वप्नातल्या घराचे स्वप्न खरे करण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसच्या बँकिंग शाखेत जाऊन गृहकर्ज मिळवू शकता. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB)आणि एचडीएफसी (HDFC)मध्ये गृहकर्ज सेवा देण्याबाबत भागीदारी झाली आहे. त्याअंतर्गत पेमेंट्स बँकेच्या साधारण 4.7 ग्राहकांना एचडीएफसीतर्फे गृहकर्ज देण्यात येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरात पसरलेल्या पोस्ट ऑफिसेसच्या 650 शाखांवर आणि 1.36 लाखाहून अधिक बँकिंग एक्सेस पॉंइंटचा फायदा मिळू शकतो. देशभरात पोस्ट ऑफिसेसचे मोठे जाळे आहे. त्यामाध्यमातून लाखो ग्राहकांना गृहकर्ज देण्याची योजना आहे. याबाबत आयपीपीबी आणि एचडीएफसीमध्ये सोमवारी MOU(मेमोरेंडम ऑफ अंडरस्टॅडिंग) साइन झाले आहे.


पोस्टमन आणि पोस्ट सेवक कर्ज वाटप करणार
एचडीएफसीने म्हटले की, या भागीदारीच्या माध्यमातून इंडिया पेमेंट बँकेची सेवा उपलब्ध करून देणारे 1.90 लाख पोस्टमन आणि ग्रामीण पोस्ट सेवक आता गृहकर्ज वाटपासाठीदेखील काम करतील. बँकांची सुविधा नसलेल्या परिसरांमध्ये देखील हे सेवक गृहकर्ज वाटपाचे काम करतील. एचडीएफसी आणि आयपीपीबी यांच्यामध्ये झालेल्या एमओयूच्या अंतर्गत क्रेडिट, टेक्निकल आणि लीगल ऍप्रेजल, प्रोसेसिंग आणि डिस्टर्समेंट सेवा एचडीएफसी पाहणार आहे, आयपीपीबी कर्जाच्या सोर्सिंगसाठी जबाबदार असणार आहेत.