`या` ट्रॅफिक पोलिसाची सोशल मीडियावर होतेय चर्चा
पोलीस म्हटलं की समोर येतो तो त्यांचा खाकी पेशा. त्या पेशात एक कणखर, निगरगठ्ठ माणूस राहतो अशी समज असते. पण ही समज खोडून टाकणारी गोष्ट समोर आली आहे. सोमवारी एक असा प्रकार घडला की, ज्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या खाकी वेशात असलेलं भावनिक मन समोर आलं आहे. सध्या ट्रॅफिक पोलिसाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई : पोलीस म्हटलं की समोर येतो तो त्यांचा खाकी पेशा. त्या पेशात एक कणखर, निगरगठ्ठ माणूस राहतो अशी समज असते. पण ही समज खोडून टाकणारी गोष्ट समोर आली आहे. सोमवारी एक असा प्रकार घडला की, ज्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या खाकी वेशात असलेलं भावनिक मन समोर आलं आहे. सध्या ट्रॅफिक पोलिसाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ट्रॅफिक पोलीस होमगार्ड आणि एक वयस्कर महिलेचा फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या फोटोची सध्या भरपूर चर्चा आहे. या फोटोतील खरं वास्तव आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 1 एप्रिलला हा फोटो सोशल मीडियावर पडला आणि तेव्हापासून तो भरपूर प्रमाणात व्हायरल झाला आहे.
कोण आहे हा ट्रॅफिक पोलीस
तेलंगणातील डीजीपीचे चीफ पब्लिक रिलेशन ऑफिसर हर्षा भार्गवी यांनी हा फोटो ट्विट केला आहे. या फोटोतील ट्रॅफिक पोलिसचा होमगार्ड हा कुक्कटपल्ली येथील असून वी गोपाल (1275) असं याचं नाव आहे. हे एका गरीब महिलेला JNTU वर जेवण भरवतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
तेलंगाना टुडेकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस होमगार्ड गेल्या तीन दिवसापासून या महिलेला चहाच्या दुकानाजवळ बसलेला दिसत आहे. होमगार्डला जेव्हा कळलं की, त्या महिलेला तिच्या मुलाने घरातून काढून टाकलं आहे तेव्हा त्याने त्या महिलेसाठी जेवण आणलं. मात्र नंतर कळलं की ती महिला स्वतःच्या हाताने जेवण जेवू शकत नव्हती. तेव्हा चक्क त्या पोलिसाने महिलेला आपल्या हाताने भरवलं आहे.