वाह रे पठ्ठ्या! मशिनकडून करुन घेतला Homework, आता मास्तरांनाही अक्षर ओळखणं कठीण
Homework: एका विद्यार्थ्यानेअजबच शक्कल लढवली आहे. त्याने आपला गृहपाठ मशिनने पूर्ण केला. गृहपाठातील अक्षर इतके तंतोतंत जुळून आले आहे की शिक्षकांनाही आता ते ओळखणे अवघड झाले आहे.
Homework: जगातलं सर्वात कठीण काम कोणतं? असं शाळेतल्या मुलांना कोणी विचारलं तर ते हमखास गृहपाठ हेच उत्तर देतील. कारण घरी येऊन गृहपाठ करणं हे कंटाळवाण काम असल्याच बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत. मग विद्यार्थी गा गृहपाठ पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरतात. काहीजण दादा ताईला लाड्यागुड्या लावतात. दरम्यान एका विद्यार्थ्यानेअजबच शक्कल लढवली आहे. त्याने आपला गृहपाठ मशिनने पूर्ण केला. गृहपाठातील अक्षर इतके तंतोतंत जुळून आले आहे की शिक्षकांनाही आता ते ओळखणे अवघड झाले आहे.
तानसंग यागेन (@TansuYegen) च्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. त्याने याला मजेशीर कॅप्शन लिहिली आहे. AI आल्यामुळे आम्ही फक्त हाताने लिहिलेला गृहपाठ घेऊ असे शिक्षक म्हणतात तेव्हा विद्यार्थ्यांनी दिलेले उत्तर.. हा व्हिडिओ पाहून लोकही आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांचाही स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. कारण नकली आणि अक्षरातला फरक करणे कठीण आहे.
एक स्वयंचलित मशीन पानांवर काहीतरी लिहित आहे. तिचा वेग इतका आहे की अवघ्या 15 सेकंदात मशिनने अनेक पाने लिहिली. विशेष म्हणजे एखाद्या माणसाच्या हस्ताक्षराप्रमाणे हे लिखाण केले आहे. यंत्राद्वारे तयार केलेले हस्ताक्षर पाहून शिक्षकही गोंधळून जातील कारण ते हाताने लिहिलेले नाही असे वाटत नाही.
25 लाख व्ह्यूज व्हिडिओ
ही क्लिप 4 दिवसांपूर्वी ट्विटरवर शेअर करण्यात आली होती आणि ती आतापर्यंत 2.5 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. या व्हिडिओला 26 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले असून सुमारे 6 हजार लोकांनी तो रिट्विट केला आहे.
माणसाच्या हस्ताक्षराप्रमाणे यंत्र किती सहजतेने लिहिते हे डोळ्याने पाहून लोक थक्क होतात.
हा खूप छान शोध असल्याचे एका यूजरने लिहिले आहे. तर मुलांना हे खूप आवडेल पण हे खूप धोकादायक आहे. त्याचा अनेक ठिकाणी गैरवापर होऊ शकतो, असेही दुसऱ्या यूजरने लिहिले.