मुंबई : भारतीय बाजारांच्या स्कूटर सेगमेंटमध्ये  Honda Activa ने आपली पसंती सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवली आहे. होंडा मोटरसायकल ऍंड स्कूटर इंडियाने मोटरसायकल सेगमेंटमध्ये नवीन प्रोडक्ट लॉंच करणार आहे. नवीन बाईक हिरो मोटोकॉर्पला टक्कर देण्याच्या हिशोबाने तयार करण्यात येणार आहे. 


स्वस्त बाईक आणणार कंपनी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

HMSIचे अध्यक्ष असुशी ओगाटा यांनी म्हटलं की, '' आमच्याकडे सीडी 110 सारखी स्वस्त मोटरसायकल आहे. परंतू बाजारातील इतरांच्या तुलनेत अद्याप मागे आहोत. याचाच अर्थ लोकांच्या मागणी आणखी वेगळी आहे. त्यामुळे स्वस्त बाईकबाबतचा आमचा रिसर्च पूर्ण झाला आहे. आता आम्ही स्वस्त मोटरसायकल लॉंच करणार आहोत''.  


भारतात हिरोच्या स्प्लेंडरशी स्पर्धा करणारी होंडा शाइन 110 सीसी वेरिएंट लॉंच होऊ शकतो. त्याशिवाय कंपनी भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर देखील लॉंच करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


हिरो मोटोकॉर्पची भारतीय बाजारावर पकड


या आर्थिक वर्षात हिरो कंपनीने 42 लाख दुचाकींची विक्री केली आहे. यामधील, 75-110 सीसी सेगमेंटमधील वाहनांना चांगली पसंती आहे.