नवी दिल्ली : भारतीय कामगार कायद्याबाबत हाँगकाँगला भलतीच चिंता सतावात आहे. हाँगकाँगला वाटते की भारतीय कामगार कायद्यात लवचिकपणाचा अभाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाँगकाँगमधील काही अर्थतज्ज्ञांचे म्हणने असे की, भारतात मध्यम आणि लघु उद्योगांमध्ये देवाण घेवाणीच्या धोरणात लवचीकता असायला हवी. हाँगकाँग व्यापार परिषदेचे (एचकेटीडीसी) प्रमुख अर्थशास्त्रज्ञ डिक्सन यांनी म्हटले आहे की, हाँगकाँग भारताच्या व्यापारी धोरणांना जाणते. पण, ते हे धोरण कसे राबवावे हे फारसे विचारात घेत नाहीत.


दरम्यान, डिक्सन यांनी ही गोष्ट मान्य केली आहे की, भारत स्वस्त दरात कामगार उपलब्ध होतात आणि त्यामुळे चांगला फायदा होतो. मात्र, द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारताने हाँगकाँगच्या लघु आणि मध्यम उद्योगांच्या संपर्कात आले पाहिजे.