Viral Video: रॅपिडो (Rapido) चालकापासून आपला बचाव करण्यासाठी तरुणीने धावत्या बाईकवरुन उडी मारल्याची घटना समोर आली आहे. चालक आपला लैंगिक छळ करत असल्याने आपण उडी मारल्याचा दावा तरुणीने केला आहे. बंगळुरुत (Bengaluru) ही घटना घडली आहे. तसंच चालक हा मूळचा आंध्रपदेशचा (Andhra Pradesh) आहे. त्याने तरुणीला चुकीच्या पद्दतीने स्पर्श करत पकडलं आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चालक आपल्याला वारंवार स्पर्श करत असल्याने आपण धावत्या बाईकवरुन उडी मारत आपला बचाव केला असं तरुणीने सांगितलं आहे. 21 एप्रिलला ही घटना घडली असून येलाहंका न्यूटाउन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 


चालकाने OTP च्या बहाण्याने घेतला मोबाइल


मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी रायडर आणि तरुणीची भेट झाली. यानंतर त्याने राईड सुरु करण्याआधी ओटीपीच्या बहाण्याने तिचा मोबाइल घेतला. यानंतर त्याने ड्रॉप लोकेशन बदललं आणि इंदिरानगरच्या जागी दुसरी जागा टाकली. दीपक राव असं या 27 वर्षीय रायरडचं नाव आहे. 


पीडत तरुणी वास्तुविशारद असून शहरातच काम करते. चालक आपल्याला वेगळ्या ठिकाणी नेत असल्याचा संशय आल्याने तिने त्याला विचारणा केली. चालक यावेळी ताशी 60किमीच्या वेगाने गाडी चालवत होता. 



चालकाने मद्यपान केल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीने आपला मोबाइल फोन त्याच्याकडून खेचून घेतला. यानंतर त्याने बाईकचा वेग वाढवल्याचं लक्षात आल्यानंतर तिने धावत्या बाईकवरुन उडी मारली. BMS Institute of Technology and Management जवळ हा सगळा प्रकार घडला. तरुणीने उडी मारल्याचं तेथील सीसीटीव्हीत कैद झालं आहे. 


दरम्यान पोलीस तपासात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. आरोपीने रॅपिडो अॅपवर होंडा अॅक्टिव्हा रजिस्टर केली होती. पण तरुणीला पिक करण्यासाठी आला तेव्हा तो बजाज पल्सर घेऊन आला होता.