होशंगाबाद : सेल्फीचं वेड एवढ वाढलंय की त्याच्या नादात आपला जीव धोक्यात आहे याची पर्वा देखील केली जात नाही. सेल्फीमुळे जीव गेल्याच्या अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत. मध्यप्रदेशच्या होशंगाबाद येथील पचमढी टेकडीवर असेच एक प्रकरण समोर आले आहे. यात एक तरुणाचा मृत्यू झाला आहे. ऋषी साहू असे त्याचे नाव असून तो आपल्या ३ मित्रांसोबत गाडरवाडा येथे फिरायला आला होता. सेल्फी घेण्याच्या नादात त्याला आपला जीव गमवावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ऋषी साहू हा आपल्या मित्रांसोबत पचमढीच्या देनवा दर्शनासाठी आला होता. तिथे शेजारीच शंभर फूट खोल दरी आहे. सेल्फी घेण्याच्या नादात तो या दरीत कोसळला. पचमढी पोलिसांनी होमगार्ड, वन विभागाच्या टीमसोबत साधारण ५ तास त्याचा शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. हजारो फूट खाली पडल्यानंतर ऋषीचा मृतदेह रात्रभर झाडावर लटकला होता. देनवा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे. देवदर्शनाला आलेले भाविक डोंगर चढून निसर्गाची मजा घेत सेल्फीसाठी धोकादायक ठिकाणी जात असतात.