Masala Dosa : मसाला डोसा हा दाक्षिणात्य पदार्थ आहे. खोबऱ्याची चटणी आणि सांबर यासोबत मसाला डोसा सर्व्ह केला जातो, मात्र, बऱ्याच हॉटेलमध्ये ग्राहकांना कधी कधी डोसासह चटणी किंवा सांबर दिला जात नाही. बिहारामधील एका प्रसिद्ध हॉटेल चालकाला मसाला डोसा सोबत सांबर न देने चांलगलेच महागात पडले आहे. कारण, मसाला डोसा सोबत सांबर न दिल्याने ग्राहकाने हॉटेल मालकाला थेट  कंझ्युमर कोर्टात खेचले. या प्रकरणी हॉटेल मालकाला दंड भरावा लागला आहे. 


काय आहे नेमकं प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनीष पाठक असे तक्रारदार ग्राहकाचे नाव आहे. मनिष हे बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील नगर बंगला घाट परिसरात राहणारे आहेत. 15 ऑगस्ट 2022 मध्ये ते आपल्या आईसह जमुना चौकाजवळील नमक रेस्टॉरंटमध्ये गेले होते. येथून 140 रुपयांचे मसाला डोसा घेतला. मसाला डोसाचे पार्सल घेवून ते घरी गेले. घरी आल्यावर त्यांनी हे पार्सल उघडले. मात्र, यात त्याना मसाला डोसासोबत सांबर मिळाला नाही. मनिष यांनी तत्काळ हॉटेलमध्ये फोन लावला. मात्र, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे ते हॉटेलमध्ये गेले. हॉटेल मॅनेजरने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मनिष यांनी मालकाशी देखील संपर्क साधला. मात्र, मालाकाने देखील प्रतिसाद दिला नाही. यामुळे त्यांनी थेट ग्राहक निवारण कक्षात तक्रार दाखल केली. 


कंझ्युमर कोर्टात 11 महिने सुरु होते प्रकरण


ग्राहक निवारण कक्षात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण कंझ्युमर कोर्टात गेले. मनिष यांनी कंझ्युमर कोर्टात 11 महिने लढा दिला. अखेरीस त्यांच्या लढ्याला यश आले. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कंझ्युमर कोर्टाला हॉटेल मॅनेडमेंटच्या सेवेत त्रुटी आढळून आल्या यामुळे निकाल मनिष यांच्या बाजूने लागाल. र ग्राहक आयोगाचे अध्यक्ष वेद प्रकाश आणि सदस्य वरुण कुमार यांनी तक्रारदाराला झालेल्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासाबद्दल दोन हजार रुपयांचा दंड, तसेच कायदेशीर खर्च म्हणून 1500 रुपयांचा वेगळा दंड हॉटेल चालकाला ठोठावला आहे. हॉटेल मालकाने  दंडाची 3500 ही एकूण रक्कम 45 दिवसांत भरण्याचा इशारा दिला. तसे न केल्यास ही रक्कम 8 टक्के व्याजासह भरावी लागेल असे देखील सुनावणीत म्हंटले आहे.