मुंबई : आपल्यापैकी प्रत्येक जण एकदा तरी हॉटेलमध्ये गेला असेल. आपण बाहेर कुठे ही फिरण्यासाठी गेलो की, राहण्यासाठी आणि फ्रेश होण्यासाठी आपल्याला हॉटेलमध्ये रुम घ्यावी लागते. हॉटेलमधील रुम या कॅटेगरी नुसार वेगवेगळ्या असतात. जसे की, नॉन एसी, एसी, डिलक्स इत्यादी. प्रत्येक हॉटेलचे आपले वेगवेगळे नियम असतात. ज्यामुळे तेथे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. जसे की काही हॉटेल्स हे खाण्या पिण्याच्या वस्तु देतात. तर काही हॉटेल्स हे इतर उपयोगाच्या वस्तु देखील आपल्या ग्राहकांना पुरवतात. जसं की, टॉवेल, इस्त्री, साबण, हँगर, भांडी इत्यादी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यामुळे बऱ्याच लोकांच्या मनात असा विचार येतो की, हे उरलेलं सामान किंवा एखादी वस्तू आपण घेऊन जाऊ शकतो का? काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाच्या बाली येथे एका हॉटेलच्या खोलीतील सामान चोरी केल्यामुळे एक भारतीय कुटुंब पकडले गेले होते.


हॉटेलने प्रसिद्ध केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर कुटुंबावर कडक टीका झाली. त्यामुळे बरेच लोक हॉटेलमधील वस्तू घरी नेताना विचारात पडतात.


त्यांच्या ही मनात भिती असते की, आपण हे चूकीचे तर करत नाही ना? त्यामुळे तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की, हॉटेलमधून कोणत्या प्रकारचे सामान तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता आणि कोणते सामान घरी घेऊन जाऊ शकत नाही? आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.


हॉटेलच्या खोलीतून तुम्ही कोणत्या प्रकारच्या वस्तू पूर्णपणे विनामूल्य घेऊ शकता?


1. पाण्याची बाटली


बरीच हॉटेल अतिथींनी कमीतकमी 2 बाटल्या पाण्यासाठी मोफत नि: शुल्क सेवा देतात. परंतु रुममधील मिनीबारमधून घेतलेल्या पाण्यासाठी मात्र तुम्हाला पैसे द्यावे लागतील. परंतु खोल्यांमध्ये अतिथींना पाण्याची विनामूल्य बाटली उपलब्ध असेल, तर तुम्ही ती तुमच्या सोबत कॅरी करु शकता.


2. चहा / कॉफी किट्स


बर्‍याच हॉटेलच्या खोल्यांमध्ये चहा / कॉफीच्या किटसह इलेक्ट्रिक केटल असतात. त्यात चहाच्या पिशव्या, कॉफी सॅशेट्स, दुधाची पावडर आणि साखर असतात. अशावेळी  त्यावरील शुल्काचा वेगळा उल्लेख न केला असल्यास तुम्ही ते घरी घेऊन जाऊ शकतात. परंतु यासाठी तुम्हाला तुमच्या हॉटेलने काय सोयी दिल्या आहेत हे माहित असणे गरजेचे आहे.


3. शिवणकामाचे किट्स


सुई, धागा, बटणं यासह कॉम्‍प्‍लीमेंटरी सर्विस म्हणून देऊ केलेल्या गोष्टी आपण घरी घेऊन जाऊ शकता.


4. ओरल हाईजिन किट्स


आपण टूथब्रश आणि टूथपेस्टची मिनी-पॅक घरी घेऊ शकता.


5. स्टेशनरी


मोनोग्राम केलेले नोटपॅड, लिफाफे, पेन्सिल, पेन इत्यादी देखील तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता.


6. टॉयलेट गुड्स


इयरबड्स, कॉटन पॅड्स, शेव्हिंग उत्पादने, साबण, शैम्पू, बॉडी लोशन, कंडिशनर, शॉवर कॅप्स, बाथरूम चप्पल देखील हॉटेलच्या खोलीतून घरी घेऊन जाता येते.


हॉटेलमधून तुम्ही कोणत्या गोष्टी घरी घेऊन जाऊ शकत नाही?


1. हॉटेलच्या खोलीतून कोणतीही टॉवेल्स, बाथरोब, साबण होल्‍डर, आरसे इत्यादी घेऊ शकत नाहीत.


2. केबल बॉक्स, अलार्म घड्याळ, टीव्ही रिमोट कंट्रोल, इस्त्री, चहाची केटल, हेअर ड्रायर इत्यादी विद्युत उपकरणांना घरी नेण्याची परवानगी नाही.


3. याशिवाय उशा, उशाचे कव्हर्स, पडदे, चादरी, आराम करण्याची गादी इत्यादींनाही घरी नेण्याची परवानगी नाही.


4. हॉटेल आवारात बसवलेली पेंटिंग्ज, ऐशट्रे, मग, हॅंगर्स, इस्त्री बोर्ड, धूपबत्ती, मॉस्किटो रिपेलेंट, दिवे, कटलरी इत्यादींनाही घरी नेण्याची परवानगी नाही.


आता तुम्हाला हा प्रश्न उपस्थीत झाला असेल की, हॉटेलच्या खोलीतून काही वस्तू चोरल्या गेल्या तर?


तर आम्ही तुम्हाला सांगतो की, कोणी हॉटेलच्या खोलीतून एखादी वस्तू चोरताना पकडला गेला असेल, तर सामान्यत: त्यांच्याकडून या वस्तूंसाठी शुल्क आकारले जाते. म्हणूनच काही हॉटेल्स या वस्तूंवर प्राईझ टॅग लावतात. अशा परिस्थितीत, जर आपल्या खोलीतून या वस्तू गहाळ झाल्या असतील, तर आपल्याला त्याची किंमत मोजावी लागेल. या व्यतिरिक्त हॉटेल तुम्हाला ब्लॅकलिस्ट देखील करू शकतात.


ब्लॅकलिस्टमध्ये आल्यानंतर, भविष्यात आपण या हॉटेलच्या कोणत्याही शाखेत पुन्हा कधीही राहू शकणार नाही. आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार देखील हॉटेल अधिकार्‍यांना आहे. त्यामुळे त्यांनी जर पोलिसात तक्रार केली, तर तुमच्यावर तुरुंगात जाण्याची देखील वेळ येऊ शकते.