How to earn money on YouTube : तुमच्या टॅलेंट असेल तर तुम्ही घर बसल्याही कमाई करु शकता. YouTube वर Video अपलोड करुन अनेक काँटेन्ट क्रिएटर लाखोची कमाई करतात. अशीच एक हाऊस वाईफ तिच्या IAS नवऱ्याच्या पगारा पेक्षा जास्त कमाई करत आहे. श्रुती शिवा असे या YouTube क्रिएटरचे नाव आहे. मेरठमध्ये राहणाऱ्याने श्रुतीने तिच्या  YouTube चॅनेलवर तिच्या कमाईची माहिती दिली आहे. यामुळे श्रुती सध्या चांगलीच ट्रेंडिंगमध्ये आहे(Success Story).  दोन वर्षापूर्वीच तिने श्रुती शिवा नावाचे यूट्यूब चॅनल सुरू केले. आता तिच्या यूट्यूब चॅनेलचे 2 लाख 10 हजारांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. ब्युटी टीप्स, किचन टीप्स, मोटीव्हेशन टॉक अशा प्रकारचे व्हिडिओ ती तीच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर करत असते. मात्र, तिने आपल्या यूट्यूब चॅनेलवर IAS नवऱ्याच्या सरकारी घराचा व्हिडिओ चांगलाच ट्रेंडिंगमध्ये आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

YouTube वर 50 हजार पेक्षा जास्त सब्सक्राइबर्स झाल्यावर  कमाई सुरु होते. स्पॉन्सरशिप मिळायला सुरुवात होते. एक-दोन लाख सब्सक्राइबर्स झाल्यानंतर स्पॉन्सरशिपला मनाई करावी लागते. माझ YouTube वरील कमाईचं प्रमुख स्त्रोत स्पॉन्सरशिप आहे. कारण मी कमी व्हिडिओ टाकते असे श्रुतीने सांगितले.


श्रुती ने का जाहीर केला तिच्या YouTube वरील कमाईचा आकडा


श्रुती तिच्या YouTube चॅनेलवर विविध प्रकारचे व्हिडिओ टाकत असते. कधी ती नविन साडी तर नविन ड्रेसचे फोटोही टाकत असते. यामुळे अनेक नेटकरी चित्र विचित्र प्रश्नांचा तिच्यावर भडीमार करतात. हे  नवऱ्याच्या कमाईतून घेतले का? नवऱ्याची कमाई किती? नवरा सरकारी नोकरी करतो म्हणून ऐवढे महागडे पकडे घेते असं म्हणत तिला ट्रोल करण्याचा प्रय्तन करतात. यामुळे श्रुतीने ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच झापले आहे. हे सगळं मी नवऱ्याच्या नाही तर माझ्या कमाईतून घेते असं म्हणत श्रुतीनेतिची YouTube वरील कमाईचा आकडा जाहीर केला. 


सरकारी नोकरी पाहून नाही तर प्रेम होतं म्हणून लग्न केले


सरकारी नोकरी आहे म्हणून लग्न असही श्रुतीला म्हंटल जाते. या मुद्दयावर देखील श्रुतीने सडेतोड उत्तर दिले.  सरकारी नोकरी पाहून नाही तर प्रेम होतं म्हणून लग्न केले असं म्हणत श्रुतीने तिची प्रेमकहानी देखील आपल्या  YouTube चॅनेलवर शेअर केली आहे.  


कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना श्रुती आणि तिचा पती अभिषेक यांची भेट झाली. श्रुती ही डेंटल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती तर तिचा पती अभिषेक हा IIT चा विद्यार्थाी  होता. इंटर कॉलेज फेस्टिवलमध्ये श्रुतीने अभिषेकला पाहिले आणि त्याच्याशी ओळख केली. यानंतर फेसबुकच्या माध्यमातून या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. काहीच दिवसात दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. 


पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिषेकला जमशेदपूरमध्ये टाटा स्टीलमध्ये नोकरी मिळाली. यानंतर श्रुती देखील जमशेदपुरमध्ये डेंटल कॉलेजमध्ये इंटर्नशिपसाठी आली. यानंतर त्यांच्या आयुष्यात टर्निंग पाईंट आला. अभिषेकने आयएएस परीक्षेचे ट्रेनिंग सुरु केलं. तर,  श्रुती तिची पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी अमेरिकेला गेली. मास्टर्स पूर्ण करून श्रुती भारतात परतली. तो पर्यंत अभिषेक देखील IAS ऑफिसर झाला होता. यानंतर दोघांनी 2020 मध्ये लग्न केले.