भेसळयुक्त मिठाई कशी ओळखाल?
मिठाई घेताना ती भेसळयुक्त आहे की नाही हे तपासून मगच घ्या.
कोटा : दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी आली म्हणजे ओघाओघाने मिठाईही आलीच. सणासुदीच्या काळात मिठाईच्या व्यवसायात मोठी वाढ होताना दिसते. अनेक व्यापारी अधिक नफा मिळवण्यासाठी, कमी दर्जाचं साहित्य वापरुन भेसळयुक्त मिठाई ग्राहकांना विकताना दिसतात. त्यामुळे मिठाई घेताना ती भेसळयुक्त आहे की नाही हे तपासून मगच घ्या.
भेसळयुक्त मिठाई कशी ओळखाल?
- मावा हातात घेऊन तो अंगठ्याने रगडा. जर माव्यात तेलकट पदार्थ जाणवला आणि मावा सुखा न झाल्यास तो योग्य मावा असल्याचं समजावं.
- माव्याचे तुकडे तोंडात टाकताच त्याला विशिष्ट प्रकारचा तेलकट वास आला तर तो मावा भेसळयुक्त असू शकतो.
- मावा हातावर काही वेळ रगडून त्याच्या वासावरुनही तो मावा चांगल्या दर्जाचा आहे की नाही ते ओळखता येईल.
- माव्याचा छोटासा तुकडा घेऊन त्यावर टिंचर आयोडिनचे (tincture iodine)तीन ते चार थेंब टाका. मावा चांगल्या दर्जाचा असल्यास त्यावर कोणताही परिणाम दिसणार नाही. पण जर मावा भेसळयुक्त असेल तर, ज्या ठिकाणी टिंचर आयोडिनचे थेंब टाकले आहेत, माव्याचा तो भाग काळा होईल. त्या जागेवर एक काळा डाग होईल. काळा डाग आल्यास मावा नकली, भेसळयुक्त असल्याचं समजावं.