नवी दिल्ली :  गाडी चालवताना नेहमी हेलमेट (Helmet) घाला, असा सल्ला पोलीस देतात. मात्र, हेल्मेट सक्ती असताना देखील वाहन चालक याकडे अनेकदा टाळाटाळ करताना दिसतात. या संदर्भात सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून जनजागृती देखील केली जाते. पण, काहीजणांच्या बाबतीत मात्र पालथ्या घड्यावर पाणी.... अशीच परिस्थिती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेल्मेट घालण्याचा तगादा नेमका आपल्यामागे का लावला जातो, याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) ट्विटरवर (Tweet) हा Video शेअर केला आहे. 


(Delhi Police Share Video) ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एक वेगात जाणारी दुचाकी कारला धडकण्यापासून थोडक्यात बचावते. याच संदर्भातील व्हिडीओ दिल्ली पोलिसांनी ट्विटवरून शेअर करून बेशिस्त दुचाकी चालकांना मोलाचा सल्ला दिला आहे.


व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?
 
ट्विटवरून शेअर करण्यात आलेल्या 16 सेकंदाच्या व्हिडीओमधून हेल्मेटचं महत्त्व समजवण्याचा प्रयत्न केला आहे. जिथं दुचाकी चालक वेगाने येत असताना एक कार रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करते. मात्र, त्यावेळी दोघांचा ताळमेळ न जमल्याने दुचाकी चालक वेग कमी करतो आणि कार चुकवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, समोर असलेल्या खांबाला गाडी धडकते आणि दुचाकी चालक रस्त्यावर आदळतो.


Traffic Rules: Traffic पोलिसांनी अडवल्यानंतर तुम्हीही या चुका करता का? थांबा आधी हे वाचा


 


देव तारी त्याला कोण मारी...


गाडीवरून खाली पडल्यानंतर दुचाकी चालकच्या डोक्याला जबर मार बसतो. परंतू, हेल्मेट असल्याने डोक्याला इजा मात्र होत नाही. एवढंच नाही, तर आणखी एक संकंट चालकावर ओढावतं. अपघातातून सावरत असतानाच गाडी धडकलेला खांब खाली कोसळतो आणि थेट दुचाकीस्वाराच्या डोक्यावर आदळतो. यावेळेस देखील हेल्मेटमुळे दुचाकीस्वाराचा जीव वाचतो.



दिल्ली पोलिसांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कधी कोणावर कोणतं संकंट येईल सांगता येत नाही. त्यामुळे गाडी चालवताना प्रत्येकाने हेल्मेटचा वापर केलाच पाहिजे. तुम्हालाही पटतंय ना?