How much gold you can keep: भारतात सोन्याला प्रचंड महत्त्व दिलं जातं. कोणत्याही महत्त्वाच्या मुहूर्तावर भारतीय लोकं सोन्याची खरेदी करत असतात. अगदी एक तोळा सोनं जरी घेता आलं नाही, तरीही एक एक ग्रॅम सोनं घेऊन आपण सोनं जमवत असतो. भारतात शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापेक्षा सोनं विकत घेण्याला अधिक प्राधान्य दिलं जातं. हळू हळू, थोडं थोडं विकत घेलेललं सोनं पुढील पिढयांना देखील दिलं जातं. अशात जर तुम्हीही सोनं विकत घेत असाल किंवा तुमच्याकडे पिढ्यानपिढ्यांपासून वारसा हक्काने आलेलं सोनं असेल तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण उद्या तुमच्या घरी आयकर विभागाची धाड पडली तर तुमचं किती सोनं जप्त केलं जाऊ शकतं? घरी सोनं साठवण्याबाबत काय नियम आहेत, याबाबत जाणून घेऊयात. 


ही आहे मर्यादा : 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    घरातील प्रत्येक पुरुष व्यक्तीसाठी 10 तोळे सोनं ( 100 ग्रॅम )  

  • घरातील प्रत्येक अविवाहित महिलेसाठी 25 तोळे ( 250 ग्रॅम )

  • घरातील विवाहित महिलेसाठी 50 तोळे ग्रॅम ( 500 ग्रॅम ) 


याशिवाय तुमच्याकडे पिढीवार म्हणजेच वारसा हक्काने आलेलं सोनं असेल तर तुम्हाला त्याचे पेपर्स दाखवावे लागतील. जर, तुमच्याकडे बिलं किंवा अधिकृत पेपर नसतील तर हे सोनं जप्त होऊ शकतं. तुम्हाला या सोन्यावर लॉन्ग टर्म कॅपिटल गेट टॅक्स देखील भरावा लागू शकतो. 


आता एका सोप्या उदाहरणाने जाणून घेऊयात. विशाल यांच्या घरात एकूण चार सदस्य आहेत. विशाल स्वतः, विशालचा भाऊ सुमित, विशालची बायको वैशाली आणि विशालची अविवाहित मुलगी आर्या. विशालला त्याच्या आईकडून मृत्युपत्रानुसार काही सोनं मिळालं आहे. या केसमध्ये विशाल घरी किती सोनं ठेवू शकतो आणि आयकर विभागाची कारवाई झाली तर किती सोनं जप्त होऊ शकतं?  


  • A. विशाल - 100 ग्रॅम 

  • B. विशालचा भाऊ सुमित 100 ग्रॅम 

  • C. विशालची बायको वैशाली 500 ग्रॅम 

  • D. विशालची अविवाहित मुलगी 250 ग्रॅम 

  • E. आईकडून मृत्युपत्रानुसार मिळालेलं 150 ग्रॅम सोनं 

  • घरातील एकूण सोनं 1350 ग्रॅम 


अशात वरील उदाहरणानुसार जर घरात 1350 ग्रॅम सोनं आढळल्यास नियमांनुसार A+B+C+D+E एकत्र केल्यास 1100 ग्रॅम सोनं जप्त केलं जाणार नाही 


मात्र घरात एकूण 1350 ग्रॅम सोनं आढळल्यास एकूण सोन्यापैकी 250 ग्रॅम सोनं जप्त केलं जाऊ शकतं.