घरात किती सोनं ठेवता येतं, तुम्हाला माहितीय का? इतक्या वजनापेक्षा जास्त असेल तर होईल प्रॉबलम
रिपोर्ट्सनुसार, यापूर्वी गोल्ड कंट्रोल ऍक्ट 1968 होता, ज्याच्या अंतर्गत तुम्ही एका मर्यादेपेक्षा जास्त सोने ठेवू शकत नव्हता.
मुंबई : आपण हे ऐकलं आहे की, अनेक घरांवरती छापा टाकला जातो आणि त्यांच्या घरातून भरपूर सोनं किंवा पैसे जप्त केले जाते. मग अशावेळी प्रश्न हा उभा राहातो की, तुम्ही तुमच्याजवळ किती सोनं ठेवू शकता? बहुतेक घरात लोकं कमी अधीक प्रमाणात सोनं ठेवतात. मग आपण घरी किती सोनं ठेवू शकतो? म्हणजेच किती सोने घरात ठेवणे कायदेशीर आहे आणि त्यापेक्षा जास्त असल्यास त्यावर कारवाई कशी करता येईल. चला याबाबत जाणून घेऊ या.
तुम्ही घरात किती सोने ठेवू शकता?
पूर्वी देशात सोने ठेवण्यावर मर्यादा होती, पण आता ती नाही. यापूर्वी मर्यादेपेक्षा जास्त सोने ठेवण्यावर लक्ष ठेवले जात होते, मात्र आता हे नियम रद्द करण्यात आले आहेत.
रिपोर्ट्सनुसार, यापूर्वी गोल्ड कंट्रोल ऍक्ट 1968 होता, ज्याच्या अंतर्गत तुम्ही एका मर्यादेपेक्षा जास्त सोने ठेवू शकत नव्हता आणि ते 1990 मध्ये रद्द करण्यात आले होतं. परंतु, आता परिस्थिती खूप बदलली आहे आणि नवीन नियमांनुसार कोणतीही मर्यादा नाही. पण, याचा अर्थ असा नाही की, तुम्ही तुमच्या घरात भरपूर सोने ठेवू शकता.
कायद्यानुसार अजून देखील तशी मर्यादा आहे, पण जर तुमच्याकडे या मर्यादेपेक्षा जास्त सोनं असेल तर काही हरकत नाही. या परिस्थितीत, जर तुमच्याकडे मर्यादेपेक्षा जास्त सोने असेल, तर तुमच्याकडे त्याचा स्रोत असावा. म्हणजेच तुमच्याकडे जेवढे सोने आहे, ते तुम्ही केव्हा खरेदी केले आणि उत्पन्नाचा स्रोत काय आहे आणि जर ते पूर्वीचे असेल, तर तुमच्याकडे हे सोनं कधीपासून आहे.
म्हणजेच काय तर तुम्हाला यासंबंधीत जर कधी प्रश्न विचारला गेला, तर तुम्हाला त्याचा स्त्रोत सांगावा लागेल आणि जर तुम्ही त्याचा वैध स्त्रोत सांगितलात तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
घरात सोनं ठेवण्याची मर्यादा काय?
आता आपल्याला माहित आहे की, ती मर्यादा काय आहे, ज्याच्या आधारावर जास्त सोनं किंवा कमी सोनं ठरवलं जातं. रिपोर्ट्सनुसार, असे सांगण्यात येत आहे की, विवाहित महिला 500 ग्रॅम सोने आरामात सोबत ठेवू शकते, तर अविवाहित महिलेकडे 250 ग्रॅम सोने असल्यास कोणतीही अडचण येणार नाही. तसेच जे विवाहित पुरुष आहेत त्यांच्याकडे 100 ग्रॅम सोने असू शकते.
जर यांपैकी कोणाकडे इतके सोने असेल, तर त्यांना उत्पन्नाचा कोणताही पुरावा देण्याची गरज नाही. यापेक्षा जास्त असल्यास त्यांचा स्रोत शोधता येईल.
तथापि, दागिन्यांच्या स्वरूपात सोनं असल्यास बऱ्यापैकी सूट दिली जाते.
यामध्येही जर कोणाकडे ज्येष्ठांचे सोनं असेल, तर त्यांना काही सूट देण्यात आली आहे, मात्र त्यापेक्षा जास्त असल्यास त्यांना कागदपत्रेही सादर करावी लागतील. त्याचबरोबर भेटवस्तूमध्ये मिळालेल्या सोन्यावरही सरकारकडून करसवलत दिली जाते आणि सोने एका मर्यादेपर्यंत ठेवता येतं.