पत्नीकडून १० हजार घेऊन उभा केला २ लाख कोटींचा व्यवसाय
देशातील दूसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसची जगभरात ख्याती आहे. पण हे कमी जणांना माहितेय की नारायण मुर्ती यांनी त्यांची पत्नी सुधा यांच्यांकडून १० हजार रुपयांची उधारी घेतली होती.
मुंबई : देशातील दूसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसची जगभरात ख्याती आहे. पण हे कमी जणांना माहितेय की नारायण मुर्ती यांनी त्यांची पत्नी सुधा यांच्यांकडून १० हजार रुपयांची उधारी घेतली होती.
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती आज ७१ वा जन्मदिवस साजरा करत आहेत. २० ऑगस्ट १९४६ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी ३६ वर्षात २ लाख कोटींचे इन्फोसिस उभे केले.
इन्फोसिस सुरू करताना त्यांच्याकडे कंपनीसाठी स्वत: ची जागा घेण्यासही पैसे नव्हते. सुधा मुर्ती यांची कंपनीच्या स्थापनेत महत्त्वाची भुमिका राहिली आहे.
सुधा यांनी बचत करुन कमावलेले १० हजार रुपये नारायण मुर्ती यांना इन्फोसिससाठी दिले.
६ महिन्यानंतर २ जुलै १९८१ ला कंपनी इन्फोसिस प्रा. लिमिटेड अशी ओळख झाली.
-१९८१ मध्ये नारायण मुर्ती, नंदन निलेकणी, एस गोपलकृष्णन, एसडी शिबुलाल, के. दिनेश आणि अशोक अरोरा यांनी पटनी कॉंम्प्यूटर सोडून पुण्यात इन्फोसिस कंसल्टंट प्रा. लिमिटेडला सुरुवात केली.
-१९८३ मध्ये न्यूयॉर्कची कंपनी डेटा बेसिक कॉर्पोरेशनची पहिली ऑर्डर मिळाली. त्यानंतर काही वर्षांनी काहीजण इन्फोसिस सोडून गेले. पण नारायण मुर्ती मागे हटले नाहीत.
-१९९३ मध्ये इन्फोसिसचे शेअर्स सार्वजनिक करण्यात आले. कंपनीचे नाव बदलून इन्फोसिस टेक्नोलॉजी असे करण्यात आले.
-पब्लिक ऑफरिंग करुन सुरुवातीला ९५ रुपये किंमतीचा शेअर ठेवण्यात आला.
-१९९४ मध्ये ४५० रु. प्रति शेअर प्रमाणे ५,५०,००० शेअर पब्लिकला ऑफर केली गेली.
-१९९९ मध्ये इन्फोसिसच्या शेअर्सचा भाव ८,१०० पर्यंत पोहोचून सर्वात महाग शेअर्स बनला.