सावधान! या नंबरच्या प्लास्टिक भांड्यांत जेवण ठेवत असाल, तर तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर
तुमच्या स्वतःच्या घरातील भांडीच तुमच्या जीवावर उठलीयेत असं आम्ही म्हंटलं तर तुम्हाला कदाचित खरं वाटणार नाही. मात्र हो हे खरंय.
Kitchen Utensils can Cause Cancer: जेंव्हा तुम्ही कोणत्याही प्लास्टिक कंटेनरमध्ये किंवा बाटलीत काही अन्नपदार्थ विकत घेतात, तेंव्हा त्याखाली लिहिलेला नंबर नक्की वाचा. 1 ते 7 पर्यंत लिहिलेले आकडे ते प्लास्टिक कंटेनर किंवा बॉटल किती सेफ आहेत किंवा नाही ते सांगतात.
तुमच्या स्वतःच्या घरातील भांडीच तुमच्या जीवावर उठलीयेत असं आम्ही म्हंटलं तर तुम्हाला कदाचित खरं वाटणार नाही. मात्र हो हे खरंय. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅलिफोर्नियामधील वैज्ञानिकांनी एक रिसर्च केला आहे. यामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुमच्या नॉनस्टिक पॅनसह तुमच्या आवडत्या जेवण बनवण्याच्या भांड्यांवर एक खास लेयर असतो ज्यामुळे तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. वैज्ञानिक याला 'फॉरेव्हर केमिकल' असं म्हणतात. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात जेवणाचं पॅकिंग करण्यासाठी आपण प्लास्टिकचाही वापर करतो. या प्लॅस्टिकच्या भांड्यांची जास्त नुकसान होऊ शकतं.
रिसर्च काय म्हणतो?
अमेरिकेच्या साऊथ कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने तब्बल 2 लाख नागरिकांवर याबाबतचा रिसर्च केला गेला. यामधील 50 जणांना लिव्हर कॅन्सर होता. तुलनेत इतर 50 जणांना लिव्हर कॅन्सर झालेला नव्हता. वैज्ञानिकांनी कॅन्सर पीडितांना तपासण्याआधी त्यांच्या रक्ताचे नमुने गोळा केलात. याची तुलना ज्यांना अशा प्रकारचा आजार नव्हता त्यांच्यासोबत केली. या अभ्यासातून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. ज्यांना कॅन्सर झाला आहे, अशा माणसांच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये विविध प्रकारचे केमिकल्स आढळून आले.
याबाबत एक्स्पर्ट काय म्हणतात?
मॅक्स हॉस्पिटलचे गॅस्ट्रो स्पेशालिस्ट डॉक्टर मानव माधवन यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण कम्फर्टला जास्त महत्त्व देतो. यामुळे आपल्या शरीरात अनेक गोष्टी जातात, ज्या पचवणं शरीराला शक्य नसतं. या गोष्टी शरीरात तशाच राहतात आणि कालांतराने त्यांचं रूपांतर कॅन्सरसारख्या आजारात होतं.
कोणतं प्लास्टिक वापरासाठी आहे सेफ?
जेंव्हा तुम्ही कोणत्याही प्लास्टिक कंटेनरमध्ये किंवा बाटलीत काही अन्नपदार्थ विकत घेतात, तेंव्हा त्याखाली त्रिकोणात लिहिलेला नंबर नक्की वाचा. 1 ते 7 पर्यंत लिहिलेले आकडे ते प्लास्टिक कंटेनर किंवा बॉटल किती सेफ आहेत किंवा नाही ते सांगतात. त्या भांड्यांवर 1 किंवा 7 नंबर असेल तर त्यापासून सावध राहणं गरजेचं आहे. ही भांडी दोनदा वापरल्यानंतर क्रश करून फेकून द्यायची असतात. 2, 4 आणि 5 मार्किंगचं भांडं वापरास सर्वात सेफ असतं. आपण तब्बल पाच ते सहा महिने त्यांचा वापर करू शकतो. 3 आणि 7 नंबरची प्लास्टिक भांडी अत्यंत घातक असतात.
how safe are your kitchen utensil small mistake may lead towards cancer