How To Apply For Driving Licence: गाडी चालवता यायला हवी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन गाडी शिकणं प्रत्येकालाच परवडतं असं नाही. त्यामुळे काही जण मित्र किंवा नातेवाईकाची गाडी घेऊन चालवायला शिकतात. पण एकदा गाडी शिकली की, ड्रायव्हिंग लायसन्सचा प्रश्न येतो. कारण विना ड्रायव्हिंग लायसन्स गाडी चालवताना वाहतूक पोलिसांनी पकडलं तर, दंड भरावा लागू शकतो. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर गाडी चालवू नका, सर्वात आधी वैध ड्रायव्हिंग लायसन्स काढा. वैध ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी सर्वात आधी लर्निंग लायसन्स काढावं लागतं. त्यानंतर परमनंट लायसन्स मिळतं. ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया कशी असते? जाणून घेऊयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी असा अर्ज कराल


  • https://sarathi.parivahan.gov.in/ या वेबपोर्टलवर जा.

  • तिथे आपलं राज्य निवडा

  • Learner License मध्ये जाऊन Application for New Learners License वर क्लिक करा

  • Learner License Application Form भरा आणि नेक्स्टवर क्लिक करा.

  • यानंतर आवश्यक कागदपत्रं अपलोड करा

  • पेमेंट मोड निवडा आणि पैसे भरा

  • त्याचबरोबर आरटीओत जाण्यासाठी स्लॉट निवडा

  • त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह आरटीओमध्ये जा.


लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रं


  • लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्सचा भरलेला फॉर्म

  • पासपोर्ट साइज फोटो

  • निवास प्रमाणपत्र (बिल बिल, लीज/भाडे करार)

  • वैध सरकारी ओळखपत्र पुरावा (मतदार आयडी, पॅन कार्ड, पासपोर्ट).


यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्सही काढावे लागेल. त्यासाठी वेगळे शुल्क भरावे लागेल आणि अंतिम चाचणी आरटीओमध्ये द्यावी लागेल. त्यानंतरच कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स दिलं जातं.