भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर कसं व्हाव? जाणून घ्या
फ्लाइंग ऑफिसरला पगार किती असतो तुम्हाला माहितीय का?
मुंबई : देशाच्या प्रत्येक सरकारी भरती प्रक्रियेत अर्ज करावा असे लाखो तरूणांचे स्वप्न असते. मात्र अशा प्रकारच्या भरती निघतात, तसेच या भरतीसाठी किती शिक्षणाची आवश्यकता असते, अशा अनेक गोष्टींची तरूणांना माहिती नसते. त्यामुळेच आम्ही तुम्हाला आज या भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर होण्यासाठी किती वयोमर्यादा व शिक्षण लागतं याची माहिती देणार आहोत. त्यासोबतचं या पदावर असलेल्या व्यक्तीला किती पगार मिळतो हे सांगणार होतो.
भारतीय हवाई दल (IAF) मध्ये फ्लाइंग ऑफिसर बनू इच्छिणारे AFCAT, UPSC NDA, NCC आणि UPSC CDS 2022 परीक्षेद्वारे अर्ज करू शकतात.येथे आम्ही 12वी उत्तीर्ण किंवा पदवीधर भारतीय वायुसेनेच्या फ्लाइंग शाखेत करिअर करू शकणारे विविध मार्ग सांगत आहोत. उमेदवार फ्लाइंग ऑफिसर म्हणून त्यांची कारकीर्द सुरू करू शकतात आणि एअर मार्शलच्या पदापर्यंत पोहोचू शकतात. दरम्यान फ्लाइंग ब्रँचमधून निवडलेली व्यक्ती हवाई दल प्रमुख बनते.
एएफसीएटीद्वारे उमेदवार फ्लाइंग ब्रँचमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी (एसएससी) अर्ज करू शकतात. फ्लाइंग ब्रँचमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोणत्याही विस्ताराशिवाय 14 वर्षांसाठी आहे.पदवीधर/अभियंता म्हणून, उमेदवार हवाई दल अकादमीद्वारे उड्डाण शाखेत प्रवेश करू शकतात, जेथे निवडलेल्या उमेदवारांना लढाऊ वैमानिक किंवा हेलिकॉप्टर पायलट किंवा वाहतूक वैमानिक म्हणून प्रशिक्षण दिले जाते. तसेच युद्धकालीन मोहिमा हाती घेता येतात. AFCAT परीक्षा भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये वर्षातून दोनदा घेतली जाते.
वय मर्यादा किती
अभ्यासक्रम सुरू होण्याच्या वेळी 20 ते 24 वर्षे असणे गरजेचे आहे. DGCA (भारत) द्वारे जारी केलेला वैध आणि सध्याचा व्यावसायिक पायलट परवाना धारक उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा 26 वर्षांपर्यंत शिथिल आहे . उमेदवार हा भारतीय आणि अनमॅरीड असावा. या पदासाठी कोणीही स्त्री-पुरुष अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
- 10+2 स्तरावर गणित आणि भौतिकशास्त्रात प्रत्येकी किमान 50% गुण.
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर (तीन वर्षांचा अभ्यासक्रम) किमान 60 टक्के
- गुणांसह किंवा समकक्ष किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 टक्के गुणांसह किंवा समतुल्य BE/B Tech (चार वर्षांचा अभ्यासक्रम) असणे आवश्यक आहे.
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स (इंडिया) किंवा एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या असोसिएट मेंबरशिपची विभाग ए आणि बी परीक्षा किमान 60% गुणांसह किंवा समतुल्य उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
- AFSB चाचणीच्या वेळी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या तारखेनुसार विद्यापीठाने जारी केलेले पदवी प्रमाणपत्र सादर केले तर, वर्षातील विद्यार्थी देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.
किती पगार मिळतो?
पगाराबद्दल बोलायचे झाले तर, 7 व्या वेतन आयोगानुसार, फ्लाइंग ऑफिसरला 56100 रुपये ते 177500 रुपये प्रति महिना पगार मिळेल. जस जसे तुम्ही हवाई दलात पद आणि दर्जा वाढता, तुमच्या वाढीव जबाबदाऱ्यांनुसार तुमचे उत्पन्न आणि इतर हक्क देखील वाढतात.