UPSC Mains उत्तीर्ण झाल्यानंतर कसे बनणार आयएएस, आयपीएस?
UPSC Mains Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नागरी सेवा परीक्षा मुख्यचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
UPSC Mains Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नागरी सेवा परीक्षा मुख्यचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती ते यूपीएससी मुख्यचा निकाल अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन पाहू शकतात. यूपीएससी मेन्समध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखत फेरीसाठी बोलावले जाते. या फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना आयएएस, आयपीएस बनण्याची संधी मिळते.
14 हजारमध्ये कितीजण उत्तीर्ण?
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यूपीएससी मेन्स परीक्षा 20 ते 29 सप्टेंबर दरम्यान घेतली होती. या परीक्षेत एकूण 14 हजार 627 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पण आता निकाल समोर आल्यानंतर 2845 उमेदवारांना यशस्वी घोषित करण्यात आले आहे.
UPSC Mains DAF: भरावा लागणार DAF फॉर्म
यूपीएससी मेन्स उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना मुलाखत फेरीसाठी डीएएफ फॉर्म भरावा लागतो. याला डिटेल्स एप्लीकेशन फॉर्म म्हणजेच डीएएफ असे म्हणतात. हा फॉर्म 13 ते 19 डिसेंबररपम्यान भरला जाणार आहे. या फॉर्ममध्ये उमेदवारांना आपला पूर्ण तपशील भरावा लागतो. याआधारे उमेदवारांना यूपीएससीच्या दिल्ली कार्यालयात ऑफिस मुलाखतीसाठी बोलावले जाते.
UPSC IAS IPS Interview: कधी होणार मुलाखत?
यूपीएससी मेन्समध्ये निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत फेरी कधी होणार? याच्या तारखेची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या नोटीसनुसार, एखाद्या उमेदवाराला नोटीस डाऊनलोड करण्यास अडचणी येत असतील तर त्याने तात्काळ पत्र पाठवून कळवावे. अन्यथा 011-23385271, 011-23381125, 011-23098543 फोन करुन आयोगाशी संपर्क साधावा. यासोबतच उमेदवार आयोगाला 011-23387310, 011-23384472 या क्रमांकावर फॅक्स करु शकतात. तसेच csm-upsc@nic.in माध्यमातून संपर्क साधू शकतात.