Tech Hack | Spam Calls कसे टाळाल? वापरा या सोप्या ट्रिक्स
`हेलो सर, मैं पूजा बोल रही हूं...` Spam Calls पासून सुटका मिळवण्यासाठी वापर `या` सोप्या ट्रिक्स
मुंबई : कंपनीचे किंवा जाहिरातीसाठी रोज न चुकता फोन येत असतो. कोणाला येत नाही असं नाही. दिवसातून एकदा तरी असा फोन येतो. स्पॅम कॉल दिवसेंदिवस वाढत आहेत. या कॉलला कंटाळून ब्लॉक केलं तरी वेगवेगळ्या नंबरवरून कंपनीकडून फोन येण्याचा प्रकार काही थांबत नाही. तुम्हीही अशा फोनला वैतागला असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
स्पॅम कॉल बंद करण्यासाठी परमनंट सोल्यूशन काढणं गरजेचं आहे. हा कॉल कसा ब्लॉक करायचा याबद्दल आज आम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत.
तुम्ही हे फोन Call Blocking Apps च्या मदतीने ब्लॉक करू शकता. गुगल प्ले स्टोरवर तुम्ही कॉल ब्लॉकसाठी पर्याय निवडू शकता. हे अॅप केवळ स्पॅन कॉल सांगणार नाहीत तर तुमचे कॉल ब्लॉक करण्यासाठीही मदत करतील.
Truecaller: या एपच्या मदतीने कोणाचा फोन आला हे ओळखता येईल. त्यामुळे धोकेबाज, फ्रॉड आणि स्पॅम कॉल्स तुम्ही उचलणार नाही. त्यांना अगदी सहज ब्लॉक करू शकता. या एपच्या मदतीने कोणत्याही क्रमांकाला तुम्ही ब्लॅकलिस्ट करू शकता आणि ब्लॉकही करता येतं.
Hiya: हे अॅप खूपच मजेशीर आणि जबरदस्त आहे. स्पॅम कॉल्स अगदी सहज ओळखतं आणि तिथून आपल्याला ब्लॉक करायला मदतही होते. या अॅपच्या मदतीने तुम्ही नाव आणि पत्ताही जोडू शकता.
Calls Blacklist: हे एक सुंदर अॅफ आहे. यामध्ये एसएमएस आणि कॉल दोन्ही एकावेळी ब्लॉक करता येतात.
Should I Answer?: हे अॅपही सर्वात उत्तम पर्याय आहे. स्पॅम नंबर पटकन हायलाइट करत. हे अॅप सतत अपडेट्स होत असतं. जर स्पॅम कॉल आला तर हे अॅप स्वत: च कॉल ब्लॉक करतं. आंतरराष्ट्रीय स्पॅम कॉल्स देखील ब्लॉक करण्याची सोय या अॅपमध्ये आहेत.
Call Blocker: या एपच्या मदतीने स्पॅम नंबर, रोबोकॉल. टेलीमार्केटिंग सारखे कॉल ब्लॉक करता येतात.