आपल्या देशात करोडो लोक रोज रेल्वेने प्रवास करत असतात. गावी जायचं असो किंवा मग दुसऱ्या राज्यात प्रवास करायचा असो, रेल्वेला नेहमीच प्राधान्य दिलं जातं. विमानाच्या तुलनेत वेळ जास्त जात असला तरी कमी तिकीटदर असल्याने सर्वसामान्यांना हा प्रवास परवडतो. त्यातच काही दिवसांत दिवाळी येणार असल्याने पुन्हा एकदा रेल्वे खचाखच गर्दीने भरलेल्या दिसतील. कारण या दिवसांमध्ये लोक आपल्या घऱी, गावी जात असतात. पण यावेळी तिकीट बूक करताना प्रवाशांना फार अडचणींचा सामना करावा लागतो. पण यावेळी जर तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या तर अत्यंत सहजपणे IRCTC वरुन कंफर्म तात्काळ तिकीट बूक करु शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IRCTC तिकीट इतक्या वेगाने बूक होतात की अनेकांना तर संधीच मिळत नाही. पण जर तुम्ही एक ट्रिक फॉलो केली तर अत्यंत आरामशीर तात्काळ तिकीट बूक करु शकता. 


बुकिंग ओपन होताच प्रक्रिया होते धीमी


प्रवाशांची नेहमीच तक्रार असते की, जेव्हा ते IRCTC वर तात्काळ तिकीट बूक करतात तेव्हा वेबसाईट अत्यंत धीम्या गतीने चालते. यादरम्यान काही लोकांना इंटरनेटचीही समस्या जाणवते. त्यामुळे अशा स्थितीत पॅसेंजर्स डिलेट्स भरेपर्यंतच सर्व सीट्स बूक होतात आणि आपण वेटिंगवर जातो. 


या ऑनलाइन टूलने तिकीट बुकिंग होईल सोपी


IRCTC वरुन तात्काळ तिकीट बूक करण्यासाठी तुम्ही IRCTC Tatkal Automation Tool चा वापर करु शकता. हे टूल तुम्हाला पॅसेंजर्स डिटेल्स भरण्यास मदत करेल आणि तुम्ही अत्यंत वेगाने तिकीट बूक करु शकाल. 


काय आहे IRCTC Tatkal Automation Tool ?


IRCTC Tatkal Automation Tool हे एक ऑनलाइन फ्री टूल आहे, जे बुकिंगमध्ये लागणारा वेळ कमी करण्यात मदत करतं. हे टूल टिकिट बुकिंग सेवा सुरु होताच नाव, वय आणि प्रवासाची तारीख फटाफट भरण्यात मदत करतं. ज्यामुळे कंफर्म तिकीट मिळणं सोपं होतं. 


या टूलवरुन तिकीट बूक कशी करायची?


- क्रोम ब्राऊजरमध्ये IRCTC Tatkal Automation Tool डाऊनलोड करा. 


- यानंतर IRCTC अकाउंटर लॉग-इन करा. 


- तात्काळ तिकीट बुकिंगच्या आधी हे टूल तुम्हाला तारीख, प्रवाशांची माहिती आणि तारीख सेव्ह करण्याची संधी देते. 


- बुकिंग प्रक्रियेदरम्यान तुम्हाला Load Data वर क्लिक करावं लागेल. यानंतर डिटेल्स सेव्ह होतील. 


- यानंतर तात्काळ पेमेंट करा. कोणत्याही तसदीविना तुमची तात्काळ तिकीट बूक होईल.