How To Check IRCTC Train Seat Availability: जगातील सर्वात मोठे रेल्वेचे नेटवर्क भारतात आहे. यात भारताचा चौथा क्रमांक आहे. देशातील बहुतांश प्रवासी हे रेल्वेनेच प्रवास करतात. लांबचा पल्ला गाठण्यासाठी रेल्वे ही आरामदायक तर आहेच पण त्याचबरोबर तिकिटांचा दरही कमी आहे. रेल्वेने प्रवास करायचा म्हटलं की सगळ्यात आधी रिझर्व्हेशन करावे लागते. कन्फर्म तिकिट न मिळाल्यास प्रवासात अडचणी येतात. पण कधी अचानक प्रवास करायचा झाल्यास रिझर्व्हेशन लगेचच मिळत नाही तसंच, कन्फर्म तिकिटही मिळत नाही. या दरम्यान वेगवेगळ्या शक्कल लढवून तिकिट मिळवावे लागते. कारण, ट्रेनच्या नियोजित वेळेच्या दोन तास आधीच तिकिट मिळू शकते. त्यानंतर कितीही प्रयत्न केले तरी तिकिट मिळत नाही. जनरल बोगीतून प्रवास करतानाच इमरजन्सी तिकिट मिळू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इमरजन्सीमध्ये ट्रेनचे तिकिट मिळवण्याचा आणखी एक पर्याय आहे. या पर्यायाबाबत अनेकांना माहिती नसते. तसं पाहायला गेलं तर ट्रेनमध्ये कधीकधी खूप जागा शिल्लक असतात. आता धावत्या ट्रेनमध्येही तुम्ही सीटची अव्हेलेबिलीटी चेक करु शकता. तसंच, कोणत्या कोचमध्ये कोणती बर्थ उपलब्ध आहे. याची माहिती कळेल. 


कसं कराल चेक?


जर तुम्ही विना तिकिट किंवा जनरल तिकिटावर प्रवास करत असाल तर आयआरसीटीच्या ऑफिशियल वेबसाइट  https://www.irctc.co.in/online-charts/ वर जायचे आहे. इथे तुम्हाला स्वतःच कळेल की ट्रेनमधील कोणत्या बर्थमधील सीट रिकामी आहे. 


वेबसाइट ओपन करताच तुम्हाला बुक तिकिट असा पर्याय दिसेल. इथे चार्ट आणि व्हेकन्सी असा पर्यायही दिसेल. त्यावर क्लिक करा. 


आता तुमच्याजवळ रिझर्व्हेशन चार्ट आणि जर्नी डिटेलची टॅब दिसेल. ज्यात ट्रेन नंबर-स्टेशन आणि प्रवासाची तारीख यासह बोर्डिंग स्थानकाचे नाव लिहणे गरजेचे आहे. 


यावर क्लिक केल्यानंतर क्लिस आणि कोचच्या आधारे रिकाम्या सीटांबाबात माहिती मिळेल. या पद्धतीने तुम्हाला माहिती मिळेल की रेल्वेत कोणत्या सीट रिकाम्या आहेत. 


आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर असलेला डेटा हा सिस्टम बेस्ड असणार आहे. अशातच तुम्ही चार्ट बनण्याच्या आधीच रिकाम्या सीटांबाबत माहिती मिळवू शकाल. पहिला चार्ट ट्रेनचा प्रवास सुरू होण्यापूर्वी 4 तास आधी तयार केला जातो. यात तुम्ही रिकाम्या सीटबाबत सगळी माहिती जाणून घेऊ शकता. मात्र, असे अनेकदा होते की लोक तिकिट तर बुक करतात पण प्रवास करु शकत नाहीत. त्यामुळं त्याची सीट रिकामीच राहते. मात्र याची माहिती इतर प्रवाशांना होत नाही. अशावेळी या रिकाम्या सीटांबाबत TTE दुसऱ्या चार्टमध्ये अपडेट करण्यात येते. या चार्टमुळं तुम्ही चालत्या ट्रेनमध्येही रिकामी सीट आहे का याची माहिती मिळवू शकता.