How To Clean Electrical Switches and Board: घराच्या स्वच्छतेकडे प्रत्येकजण बारकाईने लक्ष देतो. स्वच्छतेमुळे घरात प्रसन्न वातावरण राहतं. त्यामुळे सुट्टी असली की घरातील वस्तूंची साफसफाई केली जाते. पण अनेकदा काही वस्तू वारंवार स्वच्छ करूनही काळपटलेल्या दिसतात. त्यामुळे आपण त्या वस्तूंच्या स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतो. बरेच लोक विजेचे स्विच आणि स्विच बोर्ड साफ करण्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे घरातील विजेचे स्विच आणि बोर्ड इतके काळे पडतात की अतिशय अस्वच्छ दिसतात. तुमच्या घरात लावलेला स्विच बोर्ड घाण झाला असेल तर आम्ही तुम्हाला कसा स्वच्छ करायचा याबाबत सांगणार आहोत. यामुळे स्विच नव्यासारखा चकचकेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काळे झालेले स्विच बोर्ड साफ करण्यापूर्वी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वीजपुरवठा बंद करा. अन्यथा तुम्हाला विजेचा धक्का बसू शकतो. घरातील इतर सदस्यांनाही वीजपुरवठा बंद करण्याबाबत माहिती द्या, जेणेकरून साफसफाई करताना चुकूनही वीज चालू केली जाणार नाही. दात स्वच्छ करण्याव्यतिरिक्त, टूथपेस्टचा वापर इतर अनेक गोष्टी स्वच्छ करण्यासाठी केला जातो. तुम्ही टूथपेस्टचा वापर स्विच बोर्ड साफ करण्यासाठी देखील करू शकता. टूथपेस्ट स्विच बोर्डवरील डाग आणि घाण पूर्णपणे साफ करू शकते.


इलेक्ट्रिकल स्विच आणि स्विच बोर्ड साफ करण्यासाठी, प्रथम एका भांड्यात 3-4 चमचे टूथपेस्ट घ्या आणि त्यात 2 चमचे बेकिंग सोडा टाकून चांगले मिसळा. यानंतर, त्यात पाण्याचे काही थेंब टाकून पेस्ट तयार करा आणि स्विच बोर्डवर लावा. दहा मिनिटांनंतर, टूथब्रश किंवा क्लिनिंग ब्रशने स्विच बोर्ड घासून घ्या आणि नंतर कापडाने पुसून टाका. यानंतर इलेक्ट्रिकल स्विच आणि स्विच बोर्ड अगदी नव्यासारखा दिसेल.