LPG Connection Link with Aadhaar Card: केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी सध्या प्रत्येक सुविधेशी आधार कार्ड लिंक करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. एलपीजी कनेक्शनदेखील यातीच एक भाग आहे. यावर मिळणाऱ्या सबसिडीचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी ते आधार कार्डशी लिंक करावे लागेल.


ऑनलाइन आणि ऑफलाइन लिंकिंग 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलपीजी कनेक्शनवर सबसिडी मिळविण्यासाठी, वापरकर्त्याने प्रथम त्याचे कनेक्शन आधार क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. हे काम घरबसल्याही करता येते. एवढेच नव्हे तर तुम्ही SMSद्वारे आधार कार्ड एलपीजी कनेक्शनसोबत लिंक करू शकता.


LPG Connection Aadhaar: पुढील स्टेप्स करा फॉलो 


सर्वप्रथम UIDAI च्या नResident Self Seeding च्या पेजवर जा.
LPG निवडा आणि तुमच्या योजनेचे नाव टाका. जर इंडेन गॅस असेल तर IOCL निवडा आणि भारत गॅस कनेक्शनसाठी BPCL निवडा
आता पुढे देण्यात आलेल्या यादीतील वितरकाचे नाव निवडा.
तुमचा ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि आधार क्रमांक टाकून सबमिट करा.
आता तुमच्या मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीवर एक OTP येईल.
OTP भरा आणि दिलेल्या माहितीची पडताळणी करा.
आता त्याची सूचना तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर येईल.
आता तुमचे एलपीजी कनेक्शन आधारशी लिंक केले जाईल.


ऑफलाइन लिंक प्रक्रिया


यासाठी प्रथम वितरकाकडे अर्ज द्या.
तुमच्या गॅस कनेक्शनच्या वेबसाइटवरून सबसिडी फॉर्म डाउनलोड करा.
फॉर्म भरा आणि वितरक कार्यालयात जमा करा.
हे केल्यानंतर तुमचे एलपीजी कनेक्शन आधारशी लिंक केले जाईल.