आधार कार्ड केंद्र सुरू करुन कमाईची संधी
पाहा काय आहे आधार कार्ड केंद्र सुरू करायची प्रक्रिया...
नवी दिल्ली : जर तुम्ही सध्या पैसे कमवण्यासाठी एखादा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर, तर आधार कार्ड फ्रेंचाइजी घेण्यासाठी चांगली संधी आहे. आधार कार्डची फ्रेंचाइजी घेऊन कमाईची चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. पण ही फ्रेंचाइजी घेणार कशी? हा व्यवसाय सुरु करण्यासाठी एक लायसन्स घ्यावं लागेल. हे लायसन्स घेण्यासाठी एक परीक्षा पास करावी लागेल. जाणून घ्या काय आहे ही संपूर्ण प्रक्रिया -
लायसन्स घेण्यासाठी UIDAIकडून एक ऑनलाईन परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा UIDAI सर्टिफिकेशनसाठी घेण्यात येते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यास आपल्याला आधार नोंदणी आणि बायोमेट्रिक करावं लागतं. त्यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल.
आधार कार्ड सेंटरची कामं -
- नवं आधार कार्ड तयार करणं.
- आधार कार्डमधील स्पेलिंग, नावात बदल करणं
- पत्ता, जन्म तारीख चुकीची असल्यास ती दुरुस्त करणे
- फोटो, मोबाईल नंबर, ईमेल आयडी अपडेट करणं
आधार कार्ड सेंटर सुरु करण्यासाठी, लायसन्स मिळवण्यासाठी ,ऑनलाईल अप्लाय करावं लागेल. त्यानंतर परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेत पास झालेल्यांना आधार कार्डचं लायसन्स मिळतं. लायसन्स मिळवण्यासाठी काय आहे प्रक्रिया -
- सर्वप्रथम NSEIT (https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action) वेबसाईटवर क्लिक करा.
- त्यानंतर Create New User वर क्लिक करावं लागेल.
- त्यानंतर एक XML File तयार होईल.
- Share Code enter करण्यासाठी सांगितलं जाईल.
- XML File आणि Share Code साठी आधारची वेबसाईट https://resident.uidai.gov.in/offline-kyc वर जाऊन आपलं offline e aadhar डाऊनलोड करावं लागेल.
- येथून डाऊनलोड केल्यानंतर XML File आणि share code दोन्ही डाऊनलोड होतील.
- त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल, त्यात काही खासगी माहिती भरावी लागेल.
- हा फॉर्म सबमिट केल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर, यूजर आयडी आणि पासवर्ड येईल.
- त्यानंतर Aadhaar Testing and Certification पोर्टलवर लॉगइन करता येईल.
- त्यानंतर Continue बटणवर क्लिक करा.
- समोर एक फॉर्म, काही माहिती भरण्यासाठी येईल.
- फॉर्म भरल्यानंतर फोटो आणि सही अपलोड करता येईल.
- त्यानंतर प्रिव्हयूचा ऑप्शन दिसेल. या प्रिव्ह्यूमध्ये संपूर्ण माहिती योग्यरित्या भरली आहे की नाही, ते तपासा.
- आता Declaration Boxवर क्लिक करुन Proceed to submit formवर क्लिक करा.
संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर पेमेंट करावं लागेल. पेमेंट करण्यासाठी Siteच्या Menuवर जाऊन पेमेंट वर क्लिक करा. त्यानंतर बँक अकाऊंट सिलेक्ट करा. खाली देण्यात आलेल्या Please Click Here to generate receipt वर क्लिक करा. येथून चलानची पावती डाऊनलोड करुन ती प्रिंट करता येईल.
संपूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर 24 ते 36 तासांपर्यंत वाट पाहावी लागेल. त्यानंतरच वेबसाईटवर लॉगइन करता येईल. त्यानंतर Book Centerवर क्लिक करा. यात कोणतंही जवळचं सेंटर निवडा. या सेंटरवर आधार परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर काही दिवसांनी admit card मिळेल.