Cooking tips and tricks :  पिझ्झा म्हटलं कि, तोंडाला पाणी सुटतं. लहान असो कि मोठे पिझ्झा खाणाऱ्यांची आणि मुख्यतः पिझ्झा प्रेमींची संख्या आपल्याकडे खूप आहे. पण बाहेर पिझ्झा खाणं आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. 
दरवेळी बाहेरून पिझ्झा ऑर्डर करायचा परवड नाही आणि बाहेरच खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक सुद्धा आहेच .. मग अशात काय करायचं हा प्रश्न समोर असेल तर उत्तर आहे घरीच बनवा होममेड पिझ्झा.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिझ्झा घरी कसा बनवायचा हा तर त्याहीपेक्षा पडलेला मोठा प्रश्न...कारण बऱ्याच जणांना वाटत पिझ्झा बनवणं म्हणजे खूप अवघड काम आहे किचकट आहे आणि वेळखाऊ सुद्धा वाटत. पण आता काळजी करू नका आम्ह घेऊन आलोय एक भन्नाट उपाय 


खास म्हणजे हा पिझ्झा बनवण्यासाठी तुम्हाला बेकिंगची गरज नाहीये...या खास पिझ्झाला तुम्ही हवं ते टॉपिंग्स घालून बनवू शकता आणि ते सुद्द्धा अवघ्या काही मिनिटात.. आहे कि नाही खास... चला तर मग जाणून घेऊया मिनिटात बनणाऱ्या पिझ्झाची कृती..  (how to make pizza at home )


साहित्य 


  • - एक कप मोजरेला चीझ 

  • - अर्धा कप कापलेली शिमला मिरची 

  • - २ चमचे चिल्ली सॉस 

  • - एक चमचा ओरिगॅनो 

  • - मीठ

  • - रिंग मध्ये कापलेले टोमॅटो आणि कांदा 

  • - प्रोसेस्ड चीझ अर्धा कप 

  • - चिली फ्लेक्क्स 

  • - ५-६ ब्रेड स्लाइस 


कृती 


शिमला मिरची . कांदा, टोमॅटो, आवडीच्या सर्व भाज्या व्यवस्थित धुवून त्याचे बारीक तुकडे करा.  नॉन स्टिक पॅन गरम करून घ्या यावर ब्रेड स्लाइस भाजून घ्या, मग बेडवर सॉस लावून घ्या आणि आता यावर चीझ, आणि भाज्या पसरून घ्या त्यावर चिली फ्लेक्स आणि ओरिगानो घाला सर्व झाल्यावर वरून प्रोसेस्ड  चीझ घाला वरून हलकं मीठ घाला आणि हे स्लाइस ओव्हनमध्ये ठेऊन गरम करून घ्या ... ओव्हन नसेल तर तव्यावरसुद्धा शेकू शकता ...


चीझ वितळू लागल्यावर बाहेर काढा आणि गरमागरम सर्व्ह करा. 


चला तर मग लगेचच आपल्या मुलांना घरच्या घरी हा टेस्टी आणि कमी वेळेत बनणार पिझ्झा खाऊ घाला आणि त्यांना खूष करा... (cooking tips in maratji )