cooking hacks: मऊसूद चपाती बनवायची आहे तर कणिक मळताना मिसळा ही गोष्ट...लुसलुशीत चपाती बनलीच म्हणून समजा!
(cooking tips )चपात्या करण्याआधी आपण पीठ मळतो ,पण त्याचवेळी काही चुका करतो त्यामुळे चपात्या नीट येत नाहीत परिणामी त्या कडक होतात लवकर खराब होतात. (how to get soft roti)
Kitchen Cooking Tips : गव्हाची पोळी खाणाऱ्यांची संख्या कमी नाहीय. पण त्यातही पोळी करणे हे नवशिक्यांसाठी एक चॅलेंज सारखंच असतं. (roti making tips) अनेकांच्या पोळ्या काही तासानंतर कडक होतात. यावेळी अनेक गोष्टींना दोष दिला जातो, पण पोळीतला (Wheat Roti) कडकपणा काही करता कमी करता येत नाही. पण काही साध्या पण चमत्कारीक गोष्टी देखील असतात, त्या पाळल्या तर तुमच्या हातची पोळी देखील मऊ लुसलुशीत होवू शकते आणि तासंनतास मऊच राहते. (how to get soft roti)
बऱ्याचदा चपाती भली नाही म्हणून कडक झाली किंवा जास्त भाजली गेली म्हणून कडक राहिली अश्या अनेक गोष्टींना दोष दिला जातो पण त्या आधीची एक प्रोसेस असते त्याकडे आपण साफ दुर्लक्ष करतो..
चपात्या करण्याआधी आपण पीठ मळतो ,पण त्याचवेळी काही चुका करतो त्यामुळे चपात्या नीट येत नाहीत परिणामी त्या कडक होतात लवकर खराब होतात. (how to get soft roti)
पीठ मळताना घ्या ही काळजी
1- पीठ मळताना जर ते हाताला खूप चिकटू लागले तर समजून घ्या, त्यात खूप पाणी आहे. २-३ चमचे कोरडे पीठ घेऊन ताटात ठेवा म्हणजे ते पीठ जास्तीचे पाणी शोषून घेईल. (chapati hacks)
2- पीठ खूप कठीण झालं असेल तर त्यात थोडे पाणी घालून पीठ बोटांनी दाबून घ्या. त्यामुळे पिठात पाणी चांगले मुरून जाईल.
3- एकदा का पीठ मळलं कि मग ते परातीत ठेवा त्यावर हलकासा ओला रुमाल झाकण म्हणून ठेऊन द्या यामुळे पीठ मऊ राहते आणि चपाती चांगली मऊ आणि लुसलुशीत येते. (how to make soft and raound chapati tips)
4- जर तुम्ही अर्धा किंवा तासापूर्वी पीठ मळून घेतले असेल तर चपाती बनवण्यापूर्वी लगेचच पोळपाटावर ठेवा आणि गोलाकार फिरवा अश्याने पोळी चांगली बनते त्याचसोबत लाटायला बरं पडतं.
5- पीठ मळून लगेच चपाती बनवण्याऐवजी किमान 10 मिनिटांनी चपाती बनवायला घ्यावी.पीठ मळल्यानंतर थोडावेळ ठेवल्यास त्या पिठाच्या चपात्या खूप छान फुलतील.. (cooking tips)
6- एक गोष्ट नीट लक्षात ठेवा २४ तासांपेक्षा जास्त वेळ पीठ मळलेलं असेल तर ते वापरू नका. चपात्या चांगल्या येणार तर नाहीच शिवाय याचा आरोग्यावर परिणामसुद्धा होईल. (Health issues)
7-ज्या भांड्यात पीठ ठेवत आहात त्या भांड्यात तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्या आणि मग त्यात मळलेल्या पिठाचा गोळा ठेवा. असं केल्याने पीठ सुकत नाही.
8- हलके तेल किंवा तूप लावल्याने पीठ सुकत नाही आणि बराच काळ ताजे राहते शिवाय चपात्या छान येतात. . (kitchen cooking hacks how to get fluffy soft chapati dough fulka phooli hui chjapati tips in marathi )