Cooking Tips : इडली खाणारे आपल्याकडे बरेच जण आहेत. सकाळच्या नाश्त्याला वाफाळता इडली खाणं म्हणजे सूख...बरं त्यात इडली म्हणजे पौष्टिक पदार्थ. तेल आणि मसाले न न वापरता इडली करणं म्हणजे सकाळी सकाळी शरीराला कोणत्याही मसाल्यांमुळे तेलामुळे होणारी हानी नाही. एकूणच आरोग्याच्या दृष्टीने इडली म्हणजे उत्तम ब्रेकफास्ट. (how to make perfect spongy idali at home)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण बऱ्याचदा घरी इडली बनवताना ती नीट साधत नाही. मऊ आणि लुसलुशीत होत नाही.  सगळं प्रमाण व्यवस्थित असूनही नेमकं काय चुकतं हे आपल्याला कळत नाही. पण आता याची काळजी करू नका. मऊ आणि लुसलुशीत इडली घरच्या घरी बनवायची असेल तर काय करायला हवं यापेक्षा काय चुका टाळायला हव्या हे एकदा जाणून घ्या. (How To Make  Spongy Idli Recipe)


जर तुम्ही रवा इडली बनवणार असाल तर नेहमी लक्षात ठेवा, इडलीचा घेतला जाणारा रवा व्यवस्थित भाजून घ्यायला हवा.  रवा चांगला भाजून आंबवला कि, इडल्या छान फुगतात आणि मऊ राहतात.  अशी जाळीदार इडली  (cooking tips in marathi) चटणी नसेल आणि गरमागरम खाल्ली तरी उत्तम लागते. 


एका भांड्यात 1 वाटी उडीद डाळ घ्या ती 2-3 तास चांगली भिजवा. दुसरीकडे इडलीसाठीचा तांदूळ भिजवत ठेवा. लक्षात ठेवा, दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या भिजवा, एरव्ही आपण त्या एकत्र भिजवतो आणि गल्लत होते. 


2  उडदाची डाळ आणि तांदूळ वेगवेगळे मिक्सरमधून बारीक करून घ्यावे, एकत्र बारीक करू नका. 


3  आता बारीक केलेली ही मिश्रण एका मोठ्या भांड्यात एकत्र करून घ्या. हाताने छान (cooking tips ) एकजीव करा अश्याने आंबण्याची प्रक्रिया चांगली होते. 


4 इडलीसाठी पीठ भीजवणार असाल तर ते ,रात्रभर किमान आठ तास तरी भिजायला हवा. आपण बऱ्याचदा घाई घाईत ३-४ तास भिजवतो मग ते वापरतो, पण अश्याने पीठ नीट आंबट नाही आणि त्यापासून बनलेल्या इडली फुगतसुद्धा नाहीत. 



(video credit : Hebbar's Kitchen)


5 एकदा का पीठ बनवून झालं, व्यवस्थित आंबून फुगलं कि, जास्त हलवू नये. फुगल्यानतंर त्यात मीठ घालून त्याचे डोसे किंवा इडली करावी.   (how to make south indian style perfect soft spongy idli at home with this cooking tips in marathi )
या टिप्स नक्की ट्रायकरून पाहा, इतरांना देखील सांगायला विसरू नका.  आणि बना स्मार्ट गृहिणी. (smart kitchen tips)