Cooking Tips : घरी बनवलेला केक फुगत का नाही ? या टिप्स वापरून एकदा बनवाचं
Cake Recipe : केक परफेक्ट फुगण्यासाठी जेव्हा तुम्ही बॅटर तयार करत असता तेव्हा एक चमचा ही सिक्रेट वस्तू नंतर घाला आणि मग जादू बघा
Cooking Tips : पूर्वी केवळ वाढदिवसाला केक खाल्ले जायचे पण आजकाल हवं तेव्हा केक खायची इच्छा झाली कि तुम्ही केक खाऊ शकता. बाजारात आजकाल अनेक प्रकारच्या केक्सचे ब्रॅण्ड्स मार्केटमध्ये आहेत. पण बाजारात बनलेले केक त्यात घातलेलं केमिकल आपल्या आरोग्यासाठी किती घटक आहे. आपण सारेच जाणतो. बरं घरी केक बनवणं म्हणजे (How to make cake at home) वाटतं तितकं सोप्प काम नाहीये. केक बनवणं म्हणजे फार किचकट काम. कारण प्रमाण जरा जरी चुकलं तर केकचा बेत फसतो. पण आज अशी एक सिक्रेट रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा केक अगदी मऊ आणि परफेक्ट (cake recipe) होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. केक कोणताही बनवायचा असेल तर त्याचा बेस परफेक्ट बनणं खूप महत्वाचं असतं. बेस एकदा का व्यवस्थित झाला कि पुढचा केक अगदी परफेक्ट होतो. बेस तयार झाल्यानंतर त्यावर आपण क्रीमची फ्रॉस्टिंग करून, आवडीनुसार केक डेकोरेट करू शकता. चला तर मग जाणून घेऊया परफेक्ट केक कसा बनवायचा. (Perfect Recipe of Vanilla Cake)
साहित्य
मैदा - दीड कप
दूध- पाव कप
साखर - एक कप
मिल्क पावडर- पाऊण कप
दीड कप- मैदा
बटर- ओवून वाटी
मीठ - चवीनुसार
व्हॅनिला चिप्स
व्हॅनिला इसेन्स
बेकिंग सोडा- १ चमचा
बेकिंग पावडर - १ चमचा
कृती
सर्वप्रथम, एक मोठा बाऊल घ्या, त्यामध्ये साखर मिल्क पावडर, आणि बटर घाला आणि विस्करच्या साहित्याने फेटून घ्या.
आता त्यावर एक चाळण ठेवा. त्यात मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ चाळून घ्या.
आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. एक लक्षात ठेवा हे मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ होता काम नये.
मिश्रण तयार झाल्यावर त्यात व्हॅनिला इसेन्स आणि अॅप्पल साईडर व्हिनेगर मिक्स करून घ्या.
आता हे बॅटर तयार झालं आहे. बेकिंग ट्रेला बटरने ग्रीस करून घ्या 160 डिग्रीवर 45 मिनिटे बेक होऊद्या.
यांनतर थंड झाल्यावर व्हॅनिला चिप्स घालून सर्व्ह करा. अशा प्रकारे स्पॉंजी व्हॅनिला केक तयार.