Cleaning hacks: काचेच्या बरण्यांवरील स्टिकर्स निघत नाहीत? हे हॅक्स वापरून 2 मिनिटात पाहा जादू
(cleaning hacks) रोजच्या वापरातल्या गोष्टी असतात ज्या वापरून आपण स्मार्टपणे काही समस्यांवर सोपा असा तोडगा काढू शकतो
Cleaning Hacks tips: आपल्या प्रत्येकाच्या घरात काचेच्या बरण्या असतात . घरात येणाऱ्या किचनच्या मुख्यतः काही वस्तू जसं कि लोणची, मसाले, सॉस यासाठी येणाऱ्या बरण्या काचेच्या असतात. आणि वापरून उरलेल्या बरण्या स्वच्छ धुवून पुन्हा इतर गोष्टी ठेवणं ही तर आपल्याकडे परंपराच (reuse of glass jaar in kitchen ) आहे. असं म्हटलं तर हरकत नाही. महिलावर्ग अश्या बाटल्या पुन्हा वापर करतात. पण तुम्ही कधी हे नोटीस केलाय का बरण्यांवर लागलेलं स्टिकर्स कितीही धुतले तरी निघत नाहीत. (labels from glass jaar is impossible to remove)
मग आपण ते घासून काढण्याचा प्रयत्न करतो आणि काचेच्या बाटली किंवा बरणीला ओरखडे उठतात आणि ते दिसायला फार घाण दिसतं. एका धुण्यात तरी हे स्टिकर्स निघत नाहीत. आणि निघालेच तर त्यावरचा चिकटपणा तसंच राहतो आणि दरवेळी वापरताना तो आपल्या हाताला लागत राहतो. पण तुम्हाला माहित आहे का , ज्या गोष्टीमुळे तुम्ही हैराण होता आता त्याचं सोल्युशन आहे आणि अवघ्या काही सेकंदात तुम्ही हे चिकट स्टिकर्स कुठलाही डाग ना राहता काढू शकता. चला तर मग जाणून घेऊया याविषयी....(How To Remove Sticker Gum From Glass Bottles)
नक्की उपाय काय आहे समजून घेऊयात...
सर्वात आधी बाटलीवरील हा स्टिकर काढून घ्या.
स्टिकर काढल्यावर तुम्हाला बाटलीवर चिकट गम तसाच दिसेल
आता नेलपेंट रिमूव्हर घ्या
कापसाचा बोळा घ्या त्यावर हे रिमूव्हर टाका
आता हा बोळा जिथे चिकटपणा आहे त्या जागेवर काही वेळ पकडूनठेवा
नेलपेंट रिमूव्हरने हा चिकटपणा निघून जाईल
तुम्ही डिओड्रंटचा सुद्धा वापर करू शकता
बाटलीवर जिथे चिकटपणा आहे त्यावर डिओड्रंट स्प्रे करा
काही वेळाने तो स्वच्छ कपड्याने जरा दाब देऊन पुसून काढा
असं केल्यास स्टिकर आणि त्याचे चिकट डाग नक्कीच निघून जातील
Seema's Smart Kitchen या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत काचेच्या बाटलीवरील चिकट गोंद लगेच कसा काढायचा याचा सोपा उपाय सांगितला आहे. (sticky labels can remove with nailpaint remover)