Insurance Policy सरेंडर कशी करायची ? किती टक्के रक्कम हाती येईल ? जाणून घ्या सर्वकाही...
Insurance Policy: एक ऑप्शन सर्वात उत्तम आहे ज्यात तुम्हाला प्रीमियम भरायचा सुद्धा नाहीये, आणि लाईफ कव्हरसुद्धा मिळून जातो. यासाठी तुम्हाला केवळ...
Insurance Policy: साधारणतः घरात कोणी आजारी पडलं आणि हॉस्पिटल्सचा खर्च अव्वाच्या सव्वा होतो आणि आपल्या खिशाला अचानक भुर्दंड पडतो. एकदम एवढे पैसे भरणं आपल्याला कधीकधी शक्य होत नाही. आणि भविष्याची तडजोड म्हणून आपण इंश्युरन्स पॉलिसी काढून ठेवतो. इंश्युरन्स पॉलिसी एक अशी गोष्ट आहे जी घेताना आपण व्यवस्थित पडताळणी केली नाही तर, आपल्या खिशावर त्याचा भर पडेल आणि आपण नुकसान होऊ शकतं. (How To Surrender Bad Insurance Policy and How much amount will get know here in details)
बऱ्याचदा पूर्ण अभ्यास न करता, इतरांनी काढली म्हणून किंवा चुकीच्या माहितीमुळे आपण इंश्युरन्स पॉलिसी ( Insurance Policy) काढून बसतो. प्रत्येक सामान्य माणूस ही पॉलिसी काढतोच, पण त्याहीपेक्षा चुकीची पॉलिसी घेऊन त्यामुळे नुकसान झालेले अनेक प्रकार आजकाल खूप पाहायला मिळत आहेत.
जर तुमच्यासोबत असं काही झालं तर काय करावं ? काय उपाय आहेत? पॉलिसी सोडू शकतो का ? यावर अधिक माहिती जाणून घेऊया.
सर्वात महत्वाचं म्हणजे, कोणतीही पॉलिसी घेण्याआधी त्याविषयी सर्व अभ्यास करूनच ती घ्यावी, असा सल्ला नेहमी दिला जातो.
जेव्हा पॉलिसी घेऊन तुम्ही फसता आणि तुम्हाला पॉलिसी सरेंडर करायची असेल तर, जितके पैसे तुम्ही गुंतवले आहेत त्याचा काही भाग तुम्हाला सोडून त्याला लागतो. काहीवेळा थोडेफार पैसे हाती येतात.
पॉलिसी तरीही सुरूच ठेवायची असेल तर...
सर्वात आधी तर तुम्हाला हा विचार करायचंय की, पॉलिसी चालू ठेवणं जास्त फायद्यात जाईल की ती बंद कारण जास्त उत्तम पर्याय आहे ?
तुमची पॉलिसी मॅच्युरिटीच्या जवळ आली असेल तर ती अजिबात बंद करू नका. शेवटचे २-३ वर्ष उरले असतील तर ती चालू ठेवण्यातच फायदा आहे. पॉलिसी चालू ठेवल्याने तुम्हाला कव्हरसुद्धा मिळेल त्यासोबत टॅक्स बेनेफिट्स सुद्धा मिळेल.
जर तुम्ही कॅन्सल केलीत, तर त्याआधी हे जरूर पाहून घ्या की तुम्ही इंश्योर्ड आहेत की नाही कारण लगेचच दुसरी पॉलिसी काढलीत तर तुम्हाला जास्त कॉस्ट पडू शकते.
पॉलिसी लॅप्स होऊद्या (Let the policy lapse)
अशा वेळी तुम्ही सर्वात आधी एक काम करू शकता ते म्हणजे पॉलिसीचा हफ्ता भरणं बंद करून टाका. तुमच्या पॉलिसीला ३ वर्षापेक्षा कमी वेळ झाला असेल तर, कंपनी तुमचा 2 वर्षाचा सर्व पैसे ठेऊन देईल आणि तुम्हाला त्याचा तास फायदा होणार नाही. पहिल्या २ वर्षात जो टॅक्सच्या बेनेफिट तुम्हाला झाला आहे तो सुद्धा निघून जाईल.
पॉलिसी सरेंडर करून टाका (Surrender the policy)
पॉलिसी सुरु झाल्यानंतर 3 वर्षांनी त्यावर सरेंडर व्हॅल्यू ()सुरु होऊन जाते. तीन वर्षात तुमच्या प्रिमिअरवर कॉपर्स मिळायला सुरवात होते. त्यामुळे जर तुम्ही सरेंडर केलीत तरी, पॉलिसी सरेंडर करून काही टक्के रक्कम तुम्हाला मिळू शकते. यांनतर पॉलिसी बंद करून टाकू शकता.
जर तुम्ही पॉलिसी सरेंडर केलीत तर, पॉलिसीच्या एकूण रकमेपैकी 30 टक्के रक्कम कंपनी ठेऊन देते आणि, उरलेले पैसे तुम्हाला मिळतात.