मुंबई : नोकरदार वर्गासाठी पीएफ (Provident Fund) महत्वाचा भाग असतो. पीएफ खात्यात जमा होणाऱ्या रक्कमेचा उपयोग भविष्यात करता येतो. पीएफच्या खात्यात जमा होणाऱ्या रक्कमेपैकी काही रक्कम ही नोकरदार आणि कंपनीकडून (Employer) जमा केली जाते. तसेच पीएफमधील ठराविक रक्कम ही पेन्शन खात्यात (PF Pension Account) जमा होते. ही रक्कम निवृत्तीनंतर पेन्शनच्या स्वरुपात मिळते. ही रक्कम पेन्शन म्हणून मिळते. त्यामुळे ही रक्कम अडचणीच्या वेळेस काढण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ( How to withdraw pension amount from PF account,  know the rules and  process)   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अडचणीत पैशांची आवश्यकता असते. अशावेळेस पीएफच्या पेन्शन खात्यातून रक्कम काढण्यासाठी काही नियमांचं पालन करावं लागेल. पेन्शन व्यतिरिक्त पीएफ खात्यात जमा होणारी  रक्कम ही केव्हाही काढता येते. त्यासाठी अनेक पर्याय असतात. पण जर पीएफच्या पेन्शन खात्यातून रक्कम काढायची असेल तर, नेमकं काय करावं लागतं, याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.


पीएफ फंड म्हणजे काय?


पगारातून कापण्यात येणारी रक्कम ही पीएफमधील दोन खात्यात जमा होते. यामध्ये प्रोव्हीडेंट फंड म्हणजेच EPF आणि दुसरा भाग हा पेन्शन फंडात अर्थात EPS मध्ये जमा होतो. एकूण पीएफ रक्कमेच्या  8.33 %  रक्कम ही पेन्शन खात्यात जमा होते. तर 3.67 % टक्के पैसे इपीएफम्ध्ये जमा होते. EPS मध्ये दरमहा कमाल  1 हजार 250 रुपये जमा करता येऊ शकतात.


पेन्शन फंडातून रक्कम काढण्यासाठीचे अनेक नियम आहेत. मात्र ही रक्कम इपीएफ प्रमाणे काढता येत नाही. पेन्शन फंडातून रक्कम काढण्यासाठी पीएफ खाते सुरु होऊन किमान  6 महिने पूर्ण झालेले असावेत. तसेच पीएफ खात्याला 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम काढू शकता. यानंतर निवृत्तीनंतर ही रक्कम काढता येते. 


पीएफधारकाला ही रक्कम नोकरीचा राजीनामा दिल्यानंतरच काढता येते. यानंतरच पेन्शन खात्यातून रक्मक काढण्यासाठी अर्ज करता येऊ शकतो. पीएफ धारकाला अर्ज केल्यानंतरच्या 2 महिन्यानंतर ही रक्कम खात्यात जमा होते. ही रक्कम काढण्यासाठी पीएफधारकाला 10 C फॉर्म भरावा लागेल.  


संबंधित  बातम्या : 


Know your Rights | मापात पाप करणाऱ्यांची तक्रार कुठे करायची?


PF Withdrawal | पीएफची रक्कम किती दिवसांनंतर खात्यात जमा होते?