Crime New: कुमडी गावातील रामराज नावाच्या तरूण, त्याचं रुपा कुमारी नावाच्या मुलीवर प्रेम (Love Story) जडलं. गोष्टपर्यंत लग्नापर्यंत (Marriage) गेली. घरच्यांनी मान्य केलं अन् प्रेमी युगुलांचं (Couple) लग्न धुमधडाक्यात लावण्यात आलं. लग्न तर झालं तर पण पोटापाण्याचं काय? रामराजने नवा मिठाईच्या कॉन्ट्रॅक्टचा धंदा (Confectionery contract business) सुरू केला. सगळं काही सुरळीत असताना जोडप्यांनी आपलं बस्तान हालवलं. (husband caught his wife while cheating arranged the marriage of the wife with her lover crime news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवं कोरं जोडलं...लग्नाला काहीच दिवस झाले होते. नवऱ्याने मेहनतीने कामाला सुरूवात केली. नवऱ्याच्या हाताला हात लावावा म्हणून रुपाने (Rupa Kumari) काम करण्याचा निर्णय घेतला. रुपाच्या निर्णयाला रामराजने (Ramraj) सपोर्ट केला आणि दोघांनी गुणागोविंद्याने संसार करण्याचं ठरवलं. मिठाई बनविणारा हलवाईला काम माहिती पुढं काय मांडून ठेवलंय.


रूपाला (wife) एका नेटवर्किंग कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. नोकरी (Job) करत असताना दोघांचा संसार (Maried Life) चांगला सुरू होती. मात्र, एक दिवस संसाराला ग्रहण लागलं. दोघात तिसरा आणि आता सगळं विसरा, अशी परिस्थिती दिसू लागली. रणजीत कुमार (Ranjeet Kumar) नावाच्या व्यक्तीवर रुपाचं प्रेम जडलं. मैत्री कधी प्रेमापर्यंत गेली कळलंच नाही.


रुपा आणि रणजीत भेटत राहिले. नवऱ्याला याबद्दल काहीही माहिती नव्हतं. नवऱ्याच्या गैरहजेरीत ती गुपचूप त्याला भेटत असे. ज्यावेळी नवरा घराबाहेर जायचा त्यावेळी दोघांची भेट पक्की असायची. असं अनेक दिवस चालू असायचं. नवरा बाहेरगावी गेला की दोघं त्यांच्या घरीच भेटायचे. एक दिवस गेम झाला.


रुपा आणि रणजीत खोलीत होते. दरवाजा बंद... अचानक रामराजला घरी यावं लागलं. त्यावेळी दरवाजा उघताच रामराजला जे काही दिसलं, त्याने त्याला धक्काच बसला. बायकोचं रूप पाहून त्याला काय करावं सुधरेना. पतीने खोली बाहेरून बंद करून पोलिसांना बोलावून दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिलं.


आणखी वाचा - 'माझ्यासोबत 50 पेक्षा जास्त वेळा ठेवला शरीर संंबंध पण..', पोलिसाचे तरूणीसोबत धक्कादायक कृत्य!


पोलिसांनी (Police Case) सर्व प्रकरण समजून घेतलं. चौकीत सर्वांना बोलवून घेण्यात आलं. त्यावेळी रुपाने पोलिसांजवळ कबुली दिली. गेल्या सहा महिन्यांपासून दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, असं तिने पोलिसांना सांगितलं. या प्रकरणात काय करावं, पोलिसांना कळेना... त्यानंतर रामराजने मोठं मन दाखवलं आणि रणजीतसमोर रुपाशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. रामराजचा निर्णय ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला.


दरम्यान, माझं माझ्या पत्नीवर प्रेम आहे आणि मी तिच्या सुखासाठी काहीही करू शकतो, असं त्याचं म्हणणं होतं. रामराजने रणजीतसमोर रुपाशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर दोघेही गोंधळात पडले. मात्र,  रामराजने या प्रकरणात लेखी प्रस्ताव देखील जाहीर केलाय.