India latest News : असं म्हणतात की, पती- पत्नीचं नातं (Relationship news) हे स्वर्गातच आकारास आलेलं असतं. थोडक्यात लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधलेल्या असतात. मग का बरं, मानवाकडून या स्वर्गीय नात्याची अवहेलना केली जाते? या प्रश्नाचं उत्तर अनेकांकडे नसावं. ते असेल याची अपेक्षाही नाही. देशात नुकत्याच घडलेल्या एका घटनेला पाहून तुम्हीही या विचाराशी सहमत असात. (Husband got angry as he saw wifes white hair people vitnessed high voltage drama in temple latest Marathi news )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमधील (Bihar) नगरा येथील योगी बाबा मंदिरात नुकताच एक गोंधळ उडाला. कारण, इथं लग्नाच्या आणि साता जन्माच्या आणाभाका घेतलेल्या असताना एक पती त्याच्या पहिल्या पत्नीची फसवणूक करत दुसऱ्यांदा बोहल्यावर चढत होता. तितक्यातच गणित बिनसलं, पहिली पत्नी पोलिसांसोबतच मंदिरात आणि पतीनं पळ काढला. बनियापूर पोलीस हद्दीतील लौवाकला भागातील या प्रकरणानं सध्या अनेकांनाच चक्रावून सोडलं आहे. 


नेमकं प्रकरण ऐकून कपाळावर हात माराल 


28 वर्षीय पंकज साहाचं लग्न चकपीर गावच्या बबिता देवी यांच्याशी झालं होतं. पण, लग्नानंतर लगेचच त्यांच्यात वाद होऊ लागले. नजीकच्या नातलगांनी त्या दोघांमध्ये ताळमेळ घालून देण्याचाही प्रयत्न केला. पण, सहा महिन्यानंतरही परिस्थिती जै से थे. अखेर बबिता देवी यांनी नाईलाजानं माहेरची वाट धरली. 


हेसुद्धा पाहा:  Viral Video: म्हाताऱ्यांचा इमरान हाश्मी! बाईकवर स्टंट करताना महिलेचं घेतलं चुंबन; पाहा व्हिडीओ


पहिल्या लग्नाचा हा गोंधळ सुरु असतानाच साहा दुसऱ्या लग्नासाठीही तयार झाला. यासाठी तो नगरा येथे असणाऱ्या योगी बाबा मठ येथे पोहोचला होता. याची माहिती मिळताच बबिता देवी वडिलांसोबत लग्नस्थळी पोहोचली आणि तिला तिथं पाहून उतावळ्या नवरदेवानं तिथून धुम ठोकली. 


बबिता देवीचा संताप अनावर झाला होता, ज्यामुळं तिथं सासूसोबत तिचं कडाक्याचं भांडण झालं. झाला प्रकार पाहतो अखेर पोलिसांना परिस्थिती हाताळण्यासाठी तिथं असणाऱ्या काहीजणांना ताब्यात घ्यावं लागलं. 


क्षुल्लक कारणावरून बिनसलं... 


पीडितेनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार लग्नानंतरच्या पहिल्या तीन महिन्यांमध्येच पतीला बबिता देवीच्या डोक्यावर पांढरे केस दिसले आणि तिचं वय जास्त असल्याची शंका त्याच्या मनात घर करु लागली. मनातला संशय दूर करण्यासाठी म्हणून बबिता देवीच्या पतीनं तिचं आधार कार्ड मागवून घेतलं. ज्यामध्ये तिचं वय 23 वर्षे असल्याचं लक्षात आलं. त्या क्षणापासून या दोघांमध्ये वाद विकोपास गेले आणि मजल थेट दुसऱ्या लग्नापर्यंत मारली गेली.