SDM Jyoti Maurya Case:अलोक मौर्य (Alok Maurya) आणि एसडीएम ज्योती मौर्य (SDM Jyoti Maurya) प्रकरण सध्या प्रसारमाध्यमांवर गाजत आहे. या प्रकरणानंतर अनेक अशा घटना समोर आल्या आहेत. तर, या प्रकरणाचा धसका घेत पतींनी पत्नींचे शिक्षण थांबवले असल्याची चर्चा आहे. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. प्रयागराज येथील 50 किलोमीटर दूर असलेल्या मेजा जरार गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. रविंद्र कुमार आणि रेश्मा यांचीही एक गोष्ट समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविंद्र कुमार एका खासगी कार्यालयात काम करायचे. तर त्याची पत्नी उत्तर प्रदेश पोलिस दलात कॉन्स्टेबल आहेत. रविंद्र कुमारच्या म्हणण्यानुसार त्याने मोठ्या कष्टाने त्याच्या पत्नीला शिकवले. पण सरकारी नोकरी लागताच म्हणते पोलिस दलात भरती होताच पत्नी त्यांच्यापासून दूर जाऊ लागली, असा दावा त्यांनी केला आहे. 


प्रयागराजमध्ये मेजा येथे राहणाऱ्या रविंद्र कुमार यांचे 2017 साली रेश्मासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर एक वर्षापर्यंत त्यांच्यात सर्वकाही ठिक होते. रविंद्र दुसऱ्या राज्यात एका खासगी कंपनीत कामाला आहेत. तर, रविंद्र यांची पत्नी घरातूनच अभ्यास करुन स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. रविंद्र आणि रेश्मा यांच्याच सगळंकाही ठिक सुरू होतं. मात्र, त्यांच्या नात्यात दुरावा तेव्हा आला जेव्हा रेश्माची निवड उत्तर प्रदेश पोलिस दलात झाली. 


रविंद्र यांच्या म्हणण्यानुसार, रेश्माच्या अभ्यासासाठी लागणाऱ्या सर्व गरजा मी पूर्ण केल्या. पैसे कमी पडले तेव्हा मी जमीन विकून पैसा उभा केला. तीला पदवीपर्यंतचे शिक्षण दिले. त्यासाठी मेहनत करुन फी उभी केली. मात्र, तिला सरकारी नोकरी लागताच तिने हे सर्व विसरुन गेली. तिचा स्वभाव बदलत गेला आणि ती तिने माझ्यापासून दुरावा राखण्यास सुरुवात केली. 


रविंद्र यांच्या आरोपांवर रेश्मा यांनीही उत्तर दिलं आहे. माझ्या पतीने माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. तो मला सतत मारहाण करायचा. मात्र लोकलज्जेस्तव मी तिथेच राहणं पसंत केले. मात्र आता सहन करण्यापलीकडे गेले आहे, असं रेश्मा यांनी म्हटलं आहे. तसंच, तुम्ही पुन्हा पतीच्या घरी जाणार का? या प्रश्नावर उत्तर देताना रेश्मा यांनी म्हटलंय की त्यांनी माझी बदनामी केली आहे. ते माझी गेलेली इज्जत परत देऊ शकतील का, जर असं झालं तरच मी परत जाईन. 


दरम्यान, काही दिवसांपूर्वी रविंद्र रेश्मा यांना भेटायला गेला असताना तो पुन्हा घरी परतलाच नाही. तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तसेच, रेश्मा आरोप करत त्याच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं होतं. व रेश्मावर संशय घेतला होता.