Agra Crime News Husband Wife Lipstick: कधी कोणती घटना घडेल याची काहीच शाश्वती नाही. त्यामुळे आता चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका खळबळजनक घटनेची. ही घटना दिल्लीत घडली आहे. एका लिपस्टिकमुळे मात्र चक्क एका जोडप्याचे नाते मात्र धोक्यात आले होते. हे जोडपं इतकं वादाला गेलं की काही विचारू नका. ते थेट समुपदेशनापर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे सध्या हे प्रकरण फारचं गाजतं आहे. खरंतर हा वाद घरीच मिटवण्याचा प्रयत्न केला होता परंतु हे प्रकरण अधिकच चिवळले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण अनेकदा पाहत असतो की नवरा बायकांमध्ये अनेक वाद होताना दिसतात. त्यातून या वादांचे कारण नक्की काय असेल हेही आपल्याला कळतं नाही. या वादांचे कारण कधी काय असेल याचेही लॉजिक आपल्याला लागत नाही. सध्या या प्रकरणातही असंच काहीसं झालं आहे. यावेळी अक्षरक्ष: एका लिपस्टिकनं चक्क नवरा बायकोत वाद निर्माण झाला आहे. चला तर मग पाहुया की नक्की प्रकरण आहे तरी काय? 


समोर आलेल्या माहितीनुसार, आग्राच्या येथील शहीद नगर येथील राहणाऱ्या या जोडप्याची ही घटना आहे. या घटनेतील नवरा हा सिकंदरा भागातील आहे. तो एका चपलांच्या कारखान्यात काम करतो आहे. तीन महिन्यांपुर्वीच त्याचे एका महिलेशी लग्न झाले होते. त्यांचे नाते हे आनंदी आणि सुखाचे होते. त्यांचे सर्वच काही सुरळीत होत होते. त्याचदरम्यान असं काहीतरी घडलं की त्यांच्यात जोरात वाद निर्माण झालं आणि हा वाद अगदी समुपदेशनापर्यंत पोहचला. समुपदेशकानं त्या दोघांना फारच समजवायचा प्रयत्न केला. परंतु हे प्रकरण अजूनही चिघळले आहे. आता त्यांना पुढची तारीखही दिली आहे. 


हेही वाचा : चांगला नेता कोण? प्रश्न विचारताच सुप्रिया सुळेंचं किमान शब्दांत थेट उत्तर, पाहा काय म्हणाल्या


प्रकरण काय? 


समोर आलेल्या माहितीनुसार यावेळी नवऱ्यानं माहिती दिली की, एक दिवस तो नेहमीप्रमाणे कारखान्यातून कामावरून घरी परत आला होता. रात्री झोपताना त्याच्या पत्नीनं त्याच्यासमोरच ओठांवर लिपिस्टिक लावली होती. त्याच्या पत्नीचे असे म्हणणे होते की, तिनं सकाळी दात घासले आणि चेहरा धुतला आणि मग त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील लिपस्टिक गेली. त्यातून तिनं नाश्ताही केला तेव्हाही ही लिपस्टिक निघाली. तिच्या ओठांवर ती लिपस्टिक दिसली नाही म्हणून पतीनं तिला मारहाण केली व पोलिसातही तिनं तक्रार केली होती, असं पत्नीचं म्हणणं होतं.