चांगला नेता कोण? प्रश्न विचारताच सुप्रिया सुळेंचं किमान शब्दांत थेट उत्तर, पाहा काय म्हणाल्या

Supriya Sule: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सुप्रिया सुळे यांची. नुकतीच त्यांनी 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमातून हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक खुलासेही केले आहेत. यावेळी त्यांना असाच एक प्रश्न विचारण्यात आला होता. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 16, 2023, 01:35 PM IST
चांगला नेता कोण? प्रश्न विचारताच सुप्रिया सुळेंचं किमान शब्दांत थेट उत्तर, पाहा काय म्हणाल्या title=
supriya sule answers who is the best leader in the show khupte tithe gupte

Supriya Sule: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाची. या कार्यक्रमातून सध्या राजकारणी मंडळींचीही उपस्थिती दिसते आहे. यावेळी या कार्यक्रमातून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही आल्या होत्या. यावेळी कार्यक्रमाचे होस्ट अवधुत गुप्ते यांनी सुप्रिया सुळे यांना अनेक प्रश्न विचारले. सध्या राजकारणात विविध घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातून विरोधी पक्ष म्हणून सुप्रिया सुळेही सरकारवर टीका करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी जालना झालेल्या लाठीचार्जवरही स्पष्ट भाष्य केले. याला सरकारचं जबाबदार असल्याचा पुर्नोच्चार त्यांनी केला. यावेळी या कार्यक्रमात अवधुत गुप्ते यांनी सुप्रिया सुळे यांना विचारलं की, चांगला नेता कोण? तेव्हा या प्रश्नावर सुप्रिया सुळे नक्की काय म्हणाल्या हे आपण या लेखातून जाणून घेऊया. 

काही दिवसांपूर्वी जालन्यातील मोर्चावर जो लाठीहल्ला झाला त्यावरही अवधूत गुप्ते यांनी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला त्यावर त्या म्हणाल्या, 'जालन्यात जे झालं ते अतिशय दुर्दैवी आहे. त्यासाठी सरकारच जवाबदार आहे. कारण अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यासाठी त्यांना माफीही मागावी लागली. खरी लीडरशीप काय? चांगला लीडर कोण असतो? यश मिळालं तर त्याचं क्रेडिट टीमला देतो अन् अपयश आलं तर त्याची जबाबदारी स्वतःवर घेतो. ही खरी लीडरशीप.', असं त्या म्हणाल्या. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. याखाली नेटकऱ्यांनीही वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. 

हेही वाचा : तब्बल 140 कोटींचा मालक आहे विजय सेतुपती, ब्रॅण्डेड गोष्टींना देतो बगल; 'तो' लुक पाहून कराल कौतुक

या कार्यक्रमात आल्यावर सुप्रिया सुळेंना त्यांचा आणि अजित पवार यांच्या एकत्र फोटो दाखवल्यानंतर सुप्रिया सुळे या प्रचंड भावुक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रूही आले होते. यावेळी त्यांनी आपल्या आणि शरद पवार यांच्या नात्यावरही भाष्य केले आहे. वडील आणि मुलगी म्हणून त्यांचे नाते कसे आहे, यावरही त्या बोलल्या. त्यांनी यावेळी अनेक राजकीय मुद्द्यावरही भाष्य केले आहे. सुप्रिया सुळे यांनी अनेक विविध पैलूही समोर आणले. सध्या त्यांचा हा एपिसोडही प्रचंड गाजला होता. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आत्तापर्यंत या कार्यक्रमातून अनेक नामवंत मंडळींनी हजेरी लावली होती. राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, सुबोध भावे यांनी आत्तापर्यंत येथे हजेरी लावली होती.