Street Dog Attack: हैदराबादमध्ये (Hyderabad) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हैदराबाद शहरातील या घटनेत मरण पावलेल्या मुलाचं नावं प्रदीप असं असून त्याच्यावर झालेल्या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज (CCTV) व्हायरल (Viral) झालं आहे. ही घटना 19 फेब्रुवारी रोजी घडली असून या घटनेमुळे सर्वामान्यांनी भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार प्रदीपचे वडील गंगाधर हे सिक्युरीटी गार्डमध्ये काम करता. ते आपल्या मुलाला कामच्या ठिकाणी घेऊन गेले होते. त्यावेळी तो वडिलांपासून काही अंतरावर मोकळ्या जागी खेळत होता. वडील काही कामानिमित्त दुसरीकडे गेले असता कुत्र्यांनी या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये प्रदीप गंभीर जखमी झाला.



त्यानंतर जखमी अवस्थेत प्रदीपला त्याला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 




या विषयासंदर्भात बोलताना तेलंगणचे मंत्री के. टी रामा राव यांनी भटक्या कुत्र्यांचा विषय महानगरपालिकांच्या माध्यमातून हाताळला जात असल्याचं सांगितलं. प्राण्यांसाठीची केंद्र, बर्थ कंट्रोल सेंटर यासारख्या माध्यमातून हा विषय हाताळला जात आहे. आमची सहानुभूती मृत मुलाच्या कुटुंबियांबरोबर आहे. यामुळे तो मुलगा परत येणार नाही हे ठाऊक आहे. तरी पुन्हा असे प्रकार घडणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील असू असंही राव म्हणाले.