Hyderabad Crime : हैद्राबादच्या (Hyderabad News) तेलंगणामध्ये टास्क फोर्सने डोमलगुडा पोलिसांसह (Hyderabad Police) बँक लुटणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. आरोपींनी 3 जुलै रोजी पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम (ATM) लुटल्याची घटना घडली होती. पीएनबी एटीएममध्ये पैसे जमा करत असताना आरोपीने पीडित व्यक्तीकडून 7 लाख रुपये लुटले होते. आरोपींनी अगदी फिल्मी स्टाईलने ही चोरी केली होती. तब्बल 12 दिवसांनी पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. या धक्कादायक घटनेचा आता व्हिडीओ समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती ऑटोमेटेड टेलर मशिनमध्ये पैसे जमा करत असताना मागून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्या चेहऱ्यावर मिरचीचा स्प्रे मारला आणि त्याच्या हातातील बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना 3 जुलै रोजी शहरातील हिमायतनगर भागात असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममध्ये घडली. पोलिसांनी एटीएममध्ये लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींनी अटक केली आहे. त्यातील दोघांना एटीएमध्ये घुसून चोरी केली होती.


वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडित मुलगा जेव्हा एटीएममध्ये पैसा जमा करण्याचा प्रयत्न करत होती त्याचवेळी दोन्ही आरोपी पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममध्ये घुसले. मागून आलेल्या दोघांपैकी एकाने पीडितेच्या डोळ्यात मिरचीचा स्प्रे त्याच्याकडील पैशांनी भरलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ ही झटापट सुरु होती. बॅग हाती न लागल्याने आरोपींनी तरुणावर वार देखील केले. हाणामारीत बॅग फाटून नोटा एटीएमच्या फरशीवर विखुरल्या. दरोडेखोरांपैकी एकाने काही नोटांचे बंडल उचलून पळ काढला, तर दुसरा पीडितेच्या बॅगेतून आणखी बंडल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत राहिला. काही मिनिटांनी दोन्ही दरोडेखोर एटीएममधून बाहेर पडले.



हैदराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोड्यादरम्यान आरोपींनी मिरपूड स्प्रेद्वारे एकूण 7 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार हैदराबाद आयुक्तांच्या टास्क फोर्सने डोमलगुडा पोलिसांच्या मदतीने एटीएम चोरीमध्ये सहभागी असलेल्यांना अटक केली आहे. थनसीफ अली (24), मुहम्मद सहाद (26), थानसेह बरीक्कल (23) आणि अब्दुल मुहीस (23) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपीही केरळचे रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 3.25 लाख रुपये रोख, मिरचीचा स्प्रे आणि दरोडेखोरांनी वापरलेले वाहन जप्त केले आहे.