विवाहित पुजाऱ्याने केली प्रेयसीची हत्या; स्वतःच्याच चुकीमुळे अडकला पोलिसांच्या जाळ्यात
Hyderabad Crime : विवाहित पुजाऱ्याने प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह नाल्यात टाकल्याचा धक्कादायक प्रकार हैदराबादमध्ये समोर आला आहे. पोलिसांनी आरोपी पुजाऱ्याला अटक करुन तपास सुरु केला आहे.
Crime News : देशात सध्या रोजच प्रेमप्रकरणातून गुन्हेगारीच्या घटना घडल्याचे समोर येत आहे. हैदराबादमध्ये (Hyderabad) असाच काहीसा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हैदराबादमध्ये एका पुजार्याने आपल्या प्रेयसीची हत्या (Priest kills lover) करून तिचा मृतदेह मंदिराच्या मागे असलेल्या मॅनहोलमध्ये फेकून दिला आहे. पुजारी साई कृष्ण आणि अप्सरा नावाच्या महिलेचे एकमेकांवर प्रेम होते. आरोपी पुजारी साई कृष्ण हा विवाहित होता आणि त्याला एक मूल देखील आहे. पोलिसांनी (Hyderabad Police) दिलेल्या माहितीनुसार, अप्सरा पुजाऱ्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. त्याच दबावातून साई कृष्णने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
स्वतःच्याच चुकीमुळे फसला पुजारी
साई कृष्ण नावाच्या विवाहित पुजाऱ्यावर प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह तेलंगणातील सरूरनगर येथील रजिस्ट्रार कार्यालयामागील नाल्यात फेकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साई कृष्णाने स्वत: प्रेयसी अप्सरा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. कुरुगंती अप्सरा हिला भद्राचलमला जाण्यासाठी शमशाबाद बसस्थानकावर सोडले होते. तेव्हापासून ती कोणत्याही कॉलला प्रतिसाद देत नव्हती आणि 3 मे पासून बेपत्ता होती, असे साई कृष्णाने म्हटले होते.
मात्र साई कृष्णाच्या याच तक्रारीमुळे तो पकडला गेला. तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतसे सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक डेटा तपासल्यानंतर पोलिसांना साई कृष्णाच्या वागणुकीवर संशय आला. त्यानंतर चौकशीदरम्यान साई कृष्णाने गुन्ह्याची कबुली देत अप्सराची हत्या केल्याचा खुलासा केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून कुरुगंती अप्सरा पुजारी अय्यागरी वेंकट सूर्य साई कृष्णाला तिच्याशी लग्न करण्यास सांगत होती. अप्सराला साई कृष्णा विवाहित आहे हे माहिती होते. माझ्यासोबत लग्न कर नाहीतर सगळी हकीकत लोकांना सांगेन अशी धमकी देऊन ती साई कृष्णाला ब्लॅकमेल करत होती. अप्सराच्या वागण्याने चिडलेल्या साई कृष्णाने तिला मारण्याचा निर्णय घेतला. 3 जूनच्या रात्री साई कृष्णाने अप्सराचे घरातून अपहरण करून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह कारमध्ये टाकला. त्यानंतर मृतदेह नाल्यामध्ये फेकून दिला. त्यानंतर अप्सराच्या आईसोबत पोलीस ठाण्यात जात ती हरवल्याची खोटी तक्रार दिली.
गर्भवती होती अप्सरा
दरम्यान, हत्येचा उलगडा झाल्यानंतर अप्सराच्या नातेवाईकांनी ती गर्भवती असल्याचे पोलिसांना सांगितले. साई कृष्णाने तिचा गर्भपातही केला होता. 6 जून रोजी साई कृष्णाने तिची हत्या करुन अप्सराला नाल्यात फेकले आणि त्यावर माती टाकली. त्यानंतर साई कृष्णाने अप्सराची बॅग आणि सामानही जाळले. त्यानंतर त्याने आपली कार धुवून आपल्या घरामध्येमध्ये लावली.