हैदराबाद - हैदराबाद येथे पंजागुट्टामधील एका सरकारी रूग्णालयात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी रूग्णालयातील डॉक्टरांविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 'निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स' रूग्णालयातील डॉक्टरांकडून करण्यात आलेल्या एका शस्त्रक्रियेदरम्यान एका महिलेच्या पोटात कात्री राहिल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. शुक्रवारी याबाबत माहिती समोर आली. याप्रकरणी 'निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स' रूग्णालयातील शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तापस करीत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी महिलेल्या अचानक पोटात दुखू लागले. त्यानंतर तिला रूग्णालयात दाखल करून तिची तपासणी केली असता एक्स-रे रिपोर्टमध्ये महिलेच्या पोटात कात्री असल्याचा प्रकार समोर आला. शारीरिक हानी पोहचवल्याबद्दल डॉक्टरांच्या टीमविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



 



महिलेवर गेल्या वर्षी २ नोव्हेंबर रोजी हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेदरम्यान पोटात कात्री राहिल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महिलेवर पुन्हा शस्त्रक्रिया करून कात्री पोटातून बाहेर काढण्यात आली आहे. कात्री बाहेर काढल्यानंतर महिलेची प्रकृती उत्तम असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती 'निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स' रूग्णालयाचे संचालक डॉक्टर मनोहर यांनी दिली.