हैद्राबाद : तेलंगणामध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्येमुळे देशात एकच खळबळ माजली आहे. या घटनेविरूद्ध संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. पीडित तरूणी न्याय मिळण्यासाठी समस्त जनतेकडून फाशीची मागणी होत असताना ओडिशातील एका प्रसिद्ध वाळूशिल्पकाराने पीडित तरूणीला अनेख्या पद्धतीत श्रध्दांजली वाहिली. वाळूत शिल्प साकारत त्यांनी 'हाऊ मेनी मोअर' असा प्रश्न देखील उपस्थित केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओडिशातले प्रसिध्द वाळूशिल्पकार पटनाईक यांनी हैदाराबाद मधल्या मृत बलात्कार पीडित तरूणीला अनोखी श्रध्दांजली वाहिली आहे. आपल्या वाळूशिल्पकलेतून त्यांनी ही श्रध्दांजली वाहिली. शिवाय 'हाऊ मेनी मोअर' असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी हे वाळू शिल्प तयार केलं. त्यांचं हे शिल्प सध्या व्हायरल होत आहे. 


गुरूवारी एक अशी घटना घडली की त्या घटनमुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. महिला आयोगाकडून देखील या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे. हैदराबाद हत्याकांडातील मुख्य आरोपी मोहम्मद पाशाला सर्वात प्रथम पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी भारताच्या जनतेची मागणी आहे. 


१६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत पॅरामेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या 'निर्भया'सोबत सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरण घडलं होतं. त्यानंतर १३ दिवसांनी निर्भयानं शेवटचा श्वास घेतला. परंतु निर्भयाचे माता-पिता मात्र अद्यापही न्यायालयाचे उंबरठे झिजवत आहेत.