ह्युंदाईनॆ भारतात विकल्या 50 लाख गाड्या
ह्युंदाईने भारताच्या ऑटोमोबाईल क्षेत्रात झेप घेत, 50 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
नवी दिल्ली : ह्युंदाईने भारताच्या ऑटोमोबाईल क्षेत्रात झेप घेत, 50 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
कोरीयन कार उत्पादक
ह्युंदाई या कोरीयन कार उत्पादक कंपनीने "वेरना" ह्या मॉडेलची कार विकत भारतात 50 लाख गाड्या विक्रीचा टप्पा पार केला. कंपनीने यासंबंधीची माहिती दिली आहे. ह्युंदाई भारतातून सर्वाधिक कार निर्यात करते.
सॅंट्रो प्रचंड लोकप्रिय
सॅंट्रो या आपल्या मॉडेलने ह्युंदाई कंपनीने 1998 साली भारतात कार उत्पादन करण्यास सुरूवात केली. सॅंट्रो हे मॉडेलने भारतात प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि ह्युंदाईने भारतीय बाजारात आपले पाय रोवले. त्यानंतर कंपनीने अनेक मॉडेल बाजारात आणत विक्री वाढवत नेली.
सर्वाधिक कार निर्यातक
अलिकडेच झालेल्या एका सर्वेनुसार ह्युंदाई ही विक्रीनंतरची सेवा आणि वितरणात ग्राहकांच्या पसंतीची आहे. कंपनीने वेगवेगळ्या श्रेणीतील कार बाजारात आणत भारतातून सर्वाधिक कार निर्यात करण्याचा मान पटकावला आहे. ह्युंदाईचे भारतात 480 डिलर्स आणि 1260 सर्विस पॉइंट आहेत.