Hathras Stampede Accident: हाथरस चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर पहिल्यांदाच बाबा सूरजपाल याने प्रतिक्रिया दिली आहे.  त्याने या घटनेबद्दल दुखः व्यक्त केले आहे. सूरजपाल यांनी म्हटलं आहे की, या घटनेमुळं मी खुप दुखी आहे. लोकांनी प्रशासनावर विश्वास ठेवायला पाहिजे. कोणत्याही समाजकंटकाला माफ केले जाणार आहे. या प्रसंगातून पुन्हा उभं राहण्याची ताकद देव सगळ्यांना देवो, असं त्याने म्हटलं आहे. दरम्यान, सूरजपालला त्यांचे शिष्य भोले बाबा या नावाने ओळखतात. हाथरसमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर पहिल्यांदाच सूरजपालचे वक्तव्य समोर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूरजपाल याने पुढे म्हटलं आहे की, 2 जुलै रोजी घडलेल्या घटनेमुळं मी खूप दुःखी आहे. देव आपल्याला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. लोकांना सरकार व प्रशासनावर विश्वास ठेवायला पाहिजे. मला विश्वास आहे की अराजकता पसरवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला माफ केले जाणार नाही. मी माझे वकील एपी सिंह यांच्या माध्यमातून समितीच्या सदस्यांना विनंती केली आहे की, संतप्त कुटुंबीय आणि जखमींच्या बाजूने उभं राहणार आहे. तसंच, आयुष्यभर त्यांची मदत करावी. 


हे सर्वांनी मान्य केले आहे. ही जबाबदारीही प्रत्येकजण पार पाडत आहे. सर्व महामंतांचा आधार सोडू नका. सध्याच्या काळात, ते माध्यम आहेत जे प्रत्येकाला सद्गती आणि सदबुद्धी प्राप्त करण्याचा मार्ग दाखवतात, असंही बाबा सूरजपाल याने म्हटलं आहे. हाथरस दुर्घटनेनंतर पोलिस बाबा सूरजपाल याच्या शोधात आहे. लवकरच तो पोलिसांसमोर हजर होऊ शकतो. बाबा सूरजपाल याचा मैनपुरीमध्ये एक विशाल आश्रमदेखील आहे. जिथे भक्त सतत येत जात राहतात. 



हाथरसमध्ये सत्संगनंतर मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत या दुर्घटनेत 121 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर याने दिल्लीत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनीही त्याला ताब्यात घेतले आहे. हाथरसच्या फुलराी गावात सत्संगमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेत मुख्य सेवादार मधुकरवर एफआयआर दाखल झाली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. 


काय आहे प्रकरण?


२ जुलैच्या दिवशी उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये सूरजपाल उर्फ ​​भोलेबाबा याने आयोजित केलेल्या सत्संगाच्या वेळी ही चेंगराचेंगरी झाली. या कार्यक्रमात अपेक्षेपेक्षा जास्त  लोक आले होते. भोले बाबांनी सत्संगस्थळ सोडल्यानंतर त्यांचा स्पर्श झालेली माती गोळा करण्याकरता गर्दी जमली होती. या चेंगराचेंगरीत लोक जवळच असलेल्या नाल्यात पडले. या घटनेत आत्तापर्यंत 121 जणांचा मृत्यू झाला आहे.