बंगळुरु : कर्नाटकच्या आघाडी सरकारमध्ये सर्व काही अलबेल आहे असं वाटत नाही. हे सरकार किती दिवस टिकणार याबाबत अनेकांना प्रश्न आहे. काँग्रेस आणि जेडीएसमध्ये अजूनही वाद सुरुच आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना जेव्हा विचारण्यात आलं की, 'काँग्रेसच्या आमदारांचं म्हणणं आहे की, सिद्धारमैया त्यांचे नेते आहेत.' यावर त्यांनी म्हटलं की, 'काँग्रेस नेत्यांनी या मुद्दयावर लक्ष दिलं पाहिजे. मी या मुद्दयावर काहीच बोलू शकत नाही. जर त्यांना असंच म्हणायचं आहे तर मी पद सोडायला तयार आहे. ते सीमा ओलांडत आहेत. काँग्रेस नेत्यांनी आपल्या आमदारांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे.'



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'काँग्रेस आमदारांचं म्हणणं आहे की, सिद्धारमैया हेच त्यांचे नेते आहेत.' यावर काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री म्हणतात की, सिद्धारमैया हे बेस्ट सीएम होते. ते काँग्रेस आमदारांचे नेते आहेत. त्या आमदारांसाठी तेच मुख्यमंत्री आहे. त्यांना विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यात गैर का आहे. आम्ही सगळे कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यासोबत खूश आहोत.



गेल्या काही दिवसांमध्ये कर्नाटकमध्ये राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. याआधी काँग्रेसचे काही आमदारांनी पक्ष सोडण्याची देखील धमकी दिली होती. जेडीएस-काँग्रेस सरकारला दिलेला पाठिंबा 2 अपक्ष आमदारांनी काढून घेतला आहे. काही काँग्रेस आमदार हे भाजपच्या संपर्कात असल्याचं देखील समोर आलं होतं.