नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. कॉंग्रेसला यामुळे फटका असल्याचे दिसते आहे. अशात कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केलंय की, अय्यर यांच्या वक्तव्याशी ते सहमत नाहीयेत. अय्यर यांनी माफी मागायला पाहिजे. 


मणिशंकर अय्यर यांचं स्पष्टीकरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मणिशंकर अय्यर यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, जेव्हा मी ‘नीच’ म्हणालो त्याचा अर्थ खालच्या जातीचा असा होता. हिंदी माझी मातृभाषा नाहीये, त्यामुळे मी जेव्हाही हिंदी बोलतो तेव्हा इंग्रजीत विचार करतो. अशात जर याचा काही चुकीचा अर्थ निघत असेल तर मी माफी मागतो. दररोज पंतप्रधान मोदी आमच्या नेत्यांबाबत अभद्र भाषेचा वापर करतात. मी एक फ्रिलान्स कॉंग्रेसी आहे, मी पक्षाच्या कोणत्याही पदावर नाहीये. त्यामुळे मी पंतप्रधानांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ शकतो’.


पंतप्रधान मोदींचा पलटवार


पंतप्रधान मोदी यांनी यावर पलटवार केलाय. ते म्हणाले की, ‘अय्यर यांचं विधान मुघलसारख्या मानसिकतेला दर्शवतं. अय्यर यांनी पूर्ण गुजरातचा अपमान केला आहे. आणि जनता आपलं मत देऊन नीच म्हणणा-यांना उत्तर देईल. त्यांनी सभेत उपस्थित लोकांनाही हा प्रश्न विचारला. काय मी नीच आहे?


ते म्हणाले की, भलेही मला कुणी नीच म्हणत असेल पण मी काम गांधींच्या विचारांचे करतो. मान-सन्मान-मर्यादा हे भाजपचे संस्कार आहेत. मणिशंकर अय्यर हे मला नेहमीच नीच म्हणतात. गुजरातमध्ये कॉंग्रेस सत्तेत होती तेव्हाही माझा ते अपमान करत होते. मला तुरुंगात पाठवण्याचा कट रचण्यात आला होता’.