मुंबई :  दिल्ली पोलिसांनी न्यायालयात दिलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, सुनंदा पुष्कर यांनी आपल्या मृत्यूच्या 9 दिवस अगोदर शशी थरूर यांना मेल केला होता. या मेलमध्ये त्यांनी खूप मोठा खुलासा केला होता. या मेलमध्ये म्हटलं आहे की, मी आता माझ्या मृत्यूची वाट पाहत आहेय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनंदाच्या मृत्यूच कारण पॉझन असल्याच स्पष्ट झालं आहे. तिच्या रूममधून 27 गोळ्या सापडल्या. मात्र तिचा मृत्यू नेमक्या किती गोळ्या खाऊन झाल्या आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच पोलिसांनी सांगितले की, सुनंदाच्या शरीरावर काही जखमा देखील आहेत. मात्र या जखमा तिचा मृत्यू होण्यापूर्वीच्या आहेत असा पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, आठ जानेवारी 2014 मधील थरूर यांना लिहिलेल्या ईमेलमध्ये मला जगण्याचा इच्छा नाही मी मरणाची वाट पाहत आहे असं सुनंदा पुष्करने म्हटलं आहे. 


पोलिसांनी कोर्टात काय सांगितलं 


पोलिसांनी न्यायालयात सांगितले की सुनंदा पुष्कर यांचे मेल आणि सोशल मीडियावरील संदेश हे मृत्यूपूर्वी देण्यात आलेल्या जबाबाप्रमाणे आहेत.