....म्हणून माझ्या चेहऱ्यावर कायम तेज असते- मोदी
दिवसभर मी प्रचंड मेहनत करतो. त्यामुळे मला घाम येतो.
नवी दिल्ली: मी स्वत:च्या घामाने चेहऱ्यावर मसाज करतो. त्यामुळे माझा चेहरा नेहमी तजेलदार दिसतो, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्लीत राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी या लहानग्यांना मार्गदर्शन केले. या संभाषणादरम्यान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांना काही प्रश्नही विचारले.
तुमच्यापैकी कितीजण मेहनत करून घाम गाळतात. लहान मुलांना दिवसातून चारवेळा घाम येणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी मला प्रश्न विचारण्यात आला होता की तुमच्या चेहेऱ्यावर तेज का दिसते? त्यावेळी मी उत्तर दिलं होतं की दिवसभर मी प्रचंड मेहनत करतो. त्यामुळे मला घाम येतो आणि त्याच घामाने मी मसाज करत असल्याचे मोदी यांनी म्हटले. नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.
फक्त पोहे खाणारे लोक बांगलादेशी असतात; भाजप नेत्याचा अजब दावा
मध्यंतरी काँग्रेस नेते अल्पेश ठाकोर यांनी नरेंद्र मोदी गोरेपणासाठी दररोज चार लाख रुपये किंमतीचे मशरुम खात असल्याचा दावा केला होता. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदींचा चेहरा काळा होता. मात्र, परदेशातून आयात केल्या जाणारे मशरुम खाऊन त्यांचा रंग उजळला आहे. हे मशरुम तैवानमधून मागवले जातात. या एका मशरूमची किंमत ८० हजार रूपये आणि मोदी रोज चार लाख रूपयांचे मशरूम खातात. एका महिन्यात मोदी केवळ मशरूम खाण्यासाठी एक कोटी २० रूपये खर्च करतात, असे अल्पेश ठाकोर यांनी म्हटले होते.