गडकरी, फडणवीसांच्या बॉलिंगवर हार्दिक पांड्याची फटकेबाजी

Jan 25, 2020, 09:46 AM IST
1/6

नागपूरमध्ये 'खासदार क्रिडा महोत्सव २०२०' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. (फोटो सौजन्य : देवेंद्र फडणवीस ट्विटर)

2/6

'खासदार क्रिडा महोत्सव २०२०' या कार्यक्रमासाठी क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला आमंत्रित करण्यात आलं होतं. (फोटो सौजन्य : नितीन गडकरी ट्विटर)  

3/6

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूरात पार पडलेल्या 'खासदार क्रिडा महोत्सवा'त क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबत क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले. (फोटो सौजन्य : एएनआय/ नितीन गडकरी ट्विटर)

4/6

यावेळी फडणवीस आणि गडकरींच्या बॉलवर हार्दिकही चांगलीच फटकेबाजी करताना दिसला. (फोटो सौजन्य : एएनआय)

5/6

आपलं राष्ट्र तंदुरुस्त आणि मजबूत होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रीडा उपक्रम राबविण्यावर भर देत आहेत. आणि त्या उद्देशाने त्याने 'खेलो इंडिया'ची सुरुवात केली. सर्वात मोठ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वाधिक पदके जिंकल्याचा आनंद असल्याचं यावेळी फडणवीस म्हणाले. (फोटो सौजन्य : देवेंद्र फडणवीस ट्विटर)

6/6

याआधी नितीन गडकरी यांनी 'खासदार क्रीडा महोत्सवा'च्या निमित्ताने नागपूर शहरातील विविध मैदानांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी छत्रपती नगर येथील मैदानात क्रिकेट खेळण्याचा आनंदही लुटला. (फोटो सौजन्य : एएनआय)