चेन्नई : साऊथचे प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांचा आज वाढदिवस आहे. या खास दिवसावर ते राजकीय प्रवेशाबद्दल काय घोषणा करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी त्यांची इच्छा बोलून दाखवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते म्हणाले की, 'मी राजकारणात उतरणार असून तामिळनाडूचा मुख्यमंत्रीही बनणार आहे'.



वाढदिवसानिमित्त एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा मानस व्यक्त केला. दरम्यान, काल जोरदार पावसामुळे चेन्नईला फटका बसला. अनेक भागात पाणी साचलं आहे. ही परिस्थीती पाहता कमल हसन यांनी वाढदिवस साजरा केला नाही. या पावसामुळे या परिसरात रोगराई पसरू नये म्हणून कमल हसन यांनी वैद्यकीय शिबिरांचं आयोजन केलं आहे. 




राजकारणात येणार असल्यानं कमल हसन यांनी चित्रपट संन्यास घेतल्याचं बोललं जातंय. त्यावरही त्यांनी खुलासा केलाय. 'मी चित्रपटांमधून संन्यास घेतलेला नाही. 'विश्वरूप-२' आणि 'इंडियन-२' या दोन सिनेमांवर माझं काम सुरू आहे', असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, आज वाढदिवसानिमित्त कमल हसन मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. शिवाय ते एक अॅप सुद्धा लॉन्च करणार आहेत.